Bassapur Karnataka State Transport Corporation bus
Bassapur Karnataka State Transport Corporation bus  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बस्सापूरला बस उलटूनही दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी : बेळगावहून पाच्छापूरला निघालेली कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस हुक्केरी तालुक्यातील बस्सापूर येथे उलटली. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गुरुवारी (ता. ३१) सकाळी ही घटना घडली.केवळ दैव बलवत्तर म्हणूनच या अपघातात पाच जणांना किरकोळ दुखापत होऊन मोठा अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी (ता. ३१) सकाळी बेळगावहून पाच्छापूरला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस (केए 42 एफ 1381) निघाली होती. बस्सापूरजवळ आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यावेळी ही बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाला. सुदैवानेच या घटनेत मोठी जिवीत हानी टळली. केवळ पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यात कावेरी आडव्याप्पा गाणगी, कलगौडा शंकर पाटील, गौरव्वा सत्यप्पा ओबन्नावर, मल्लिकार्जुन मल्लाप्पा गजपती व अश्विनी रामाप्पा चौगुला यांचा समावेश आहे.

त्यांना उपचारांसाठी बेळगावच्या बिम्स जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आले. पाच्छापूरचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुरगोड व सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यमकनमर्डी पोलिस या अपघाताबाबत अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

PM Modi: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update : "ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच," बावनकुळेंचा ठाकरे-राऊतांना टोला

SCROLL FOR NEXT