bus pass distribution for students in nipani belagavi start from 2 days 
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीतून होतंय बस पासचे वाटप ; विद्यार्थ्यांनो सिंधू ऍपवर करा नोंद

सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सध्या पदवी, पदवीपूर्व व विविध प्रशिक्षण देणारी महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बसपास वितरण सुरु केले आहे. त्यासाठी प्रथम सेवा सिंधू ऍपवर विद्यार्थ्याने नोंद करून घेणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत निपाणी आगारातून 95 महाविद्यालयीन बस पासचे वितरण झाले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या अद्याप मोजकी असल्यामुळे बसपासला म्हणावी तशी मागणी नसल्याचे चित्र दिसत आहे. 

निपाणी आगारातून दोन दिवसापासून बसपास वितरण सेवा सुरु झाली आहे. सेवासिंधू ऍपवर नोंदणी असल्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सर्व्हर डाउनचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसपास मिळविण्यासाठी दोन-तीन दिवस लागत आहेत. अद्याप ग्रामीण भागातील बऱ्याच मार्गावरील बससेवा सुरु नसल्याने तेथील विद्यार्थ्यांनी बसपास घेतलेला नाही. बससेवा नियमित केल्यावर विद्यार्थी बसपासला मागणी वाढणार आहे. त्यामुळे निपाणी आगाराने खेडेगावातील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. 

"दोन दिवसापासून बसपास वितरण सुरु केले आहे. मात्र खेडेगावातील विद्यार्थ्यांचा अद्याप प्रतिसाद कमी आहे. सध्या महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसपास घेऊन जावेत."

- एस. आर. जोगीरामगोळ, वाहतूक नियंत्रक, पास विभाग, निपाणी 

बसपासचे दर असे 

  • महाविद्यालय-शाळा               दर 
  • पदवी महाविद्यालय             1550 
  • पदवीपूर्व महाविद्यालय        1050 
  • आयटीआय महाविद्यालय     1310 
  • प्राथमिक, माध्यमिक शाळा    550 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT