calculation of working of congress party in 15 year for corporation in sangli palus 
पश्चिम महाराष्ट्र

सत्ता मिळवून केले काय ? सत्ताधारी काँग्रेसला मांडावा लागणार लेखाजोखा

संजय गणेशकर

पलूस (सांगली) : पलूस नगरपालिकेत पहिल्यांदाच मिळालेल्या काँग्रेसच्या एकहाती सत्तेला चार वर्षे झाली आहे. पंचवार्षिकमधील नऊ महिने शिल्लक आहेत. सध्या पालिकेत निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली आहे. स्वतंत्र पाणी योजनेला मिळाळेली तांत्रिक मंजुरी हेच काय ते चार वर्षातील भरीव काम म्हणावे लागेल. सत्ता मिळवून केले काय? याचा लेखाजोखा सत्ताधाऱ्यांना मांडावा लागणार आहे.  

पलूस पालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने पालिकेत सत्ता काबीज केली. काँग्रेसने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवला. स्वाभिमानी विकास आघाडीने ४, भाजपने १ जागा जिंकली. राष्ट्रवादी व शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव पुदाले व खाशाबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने निवडणूक लढवली.

पलूसचा विकास झपाट्याने करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. ती आश्वासने पूर्ण झाली का? शहरात किती विकासकामे झाली? पालिकेत कारभार पारदर्शक झाला का? अजूनही किती विकासकामे बाकी आहेत? याचा लेखाजोखा सत्ताधारी काँग्रेसला मांडावा लागणार आहे. सत्ताधारी काँग्रेसकडे अजूनही नऊ महिने शिल्लक आहेत. या कालावधीत शिल्लक कामे, जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची संधी आहे. 

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पालिका व काँग्रेस नगरसेवकांच्या कारभाररावर बारीक लक्ष आहे. पलूससाठी स्वतंत्र पाणी योजनेस त्यांनी शासनाकडून मंजुरी मिळवली आहे. स्वच्छतेसाठी शहरास पुरस्कार मिळाले आहेत. उपलब्ध निधीतून रस्ते, गटारीची कामे होत आहेत. दुर्दैवाने काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व वसंतराव पुदाले व स्वाभिमानिचे संस्थापक बापूसाहेब येसुगडे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर पुढील नऊ महिन्यात काय राजकीय घडामोडी होतात. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सध्या उर्वरित कालावधीत शिल्लक विकासकामे पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. त्याबरोबरच पालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस, स्वाभिमानी विकास आघाडी, भाजप, शिवसेना काय भूमिका घेणार कोण, कोणाबरोबर युती करणार हे महत्त्वाचे आहे.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT