पश्चिम महाराष्ट्र

सांगलीकरांनो वस्तूंच्या वाहतुकीसाठी इथे फोन करा

सकाळवृत्तसेवा

सांगली : संचारबंदी काळात जीवनावश्‍यक वस्तुंचा तुटवडा पडू नये यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांची तालुकास्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे.

जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहन धारकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र घ्यावे. जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने, अत्यावश्‍यक सेवांतील वाहनांसाठी ही सुविधा आहे. ऑनलाईन सुविधाही सुरू करत आहे, त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

नियुक्त केलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्‍यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करावे. जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. 

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे म्हणाले,""आवश्‍यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण व जीवनावश्‍यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र देण्यास तालुकास्तरावर मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

सांगली मुख्यालय - प्रशांत जाधव (7385389969), प्रशांत दगडे (9975279233), मिरज - आरती देसाई (9422406947), अभिजीत भोसले (9422020028), कवठेमहांकाळ - प्रदिप भाट (9011411904), अश्‍विनी चव्हाण (7507085828), जत - अमर भंडारे (9942999171), किरण कारंडे (8421294328), तासगाव - ए. ए. पुजारी (8055991900), समाधान महानवर (7972995310), विटा - सागर चौगुले (9130459009), अर्चना पवार (7350948662), आटपाडी - नवाब मुजावर (8888544411), गणेश भानवसे (7218187079), इस्लामपूर - अभिजीत पोटे (9021256165), नेहा इदाते (9850079290), शिराळा - विष्णु चव्हाण (9130660102), संजय भोसले (7757930739), कडेगाव - सागर विश्वासराव (9545034411), धनश्री माळी (9970991525), पलूस - शंभुराजे पवार (9822415999), मयुर जगदाळे (7030334444).  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT