पश्चिम महाराष्ट्र

आमच्या गावात रास्त भावात, शेतकरी संघटनेचे अभियान

सकाळ वृत्तसेवा

नगर ः देशावर, राज्यावर कोरोनाचे संकट आहे. आपण या संकटाला अतिशय सावधगिरिने व धीराने सामोरे जात आहात. आपली कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. या संकटात शेतकरी स संघटना आपल्या बरोबर आहे व प्रशासनाला आवश्‍यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे. 

लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सर्व उद्योग धंदे बंद आहेत, पण शेती मात्र चालू आहे. जनतेला खाण्या पुरते पिकत पण लॉक डाऊमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.  

राज्यभर शेतात भाजीपाला, धान्य, कडधान्य विक्रीसाठी तयार आहे परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यसाठी प्रमुख कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे शेतातला माल शहरात येणार नाही व शहरांमध्ये, भाजीपाल्याची प्रचंड टंचाई निर्माण होऊ शकते. भाज्यांचे दर ही गगनाला भिडू शकतात.

 या वर उपाय म्हणून शेतकरी संघटनेने 'आमच्या गावात रास्त भावात' हे अभियान सुरु केले आहे. शेतकरी रास्त भावात भाजीपाला शहरात पुरवण्यास तयार आहे. ते करण्यासाठी शेतकर्यांना किंवा शहरात विकणाऱ्यांना तातडीने वाहन व व्यक्ती निहाय पास/ परवाने देण्याची व्यवस्था करण्यात यावी. पोलिसांनी शेतीमाल वाहतुक करणाऱ्या किंवा विकुन मोकळा परत जणाऱ्यांना त्रास न देण्याबाबत सुचना देण्यात याव्यात. 
विदर्भ मराठवाड्यात शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात कापुस शिल्लक आहे. कोरोनामुळे सी. सी. आय मार्फत होणारी शासकीय खरेदी बंद झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापुस साठवलेला आहे व उन्हाळ्याच्या कडक उन्हात काही दुर्घटना होण्याची दाट शक्‍यता असते. शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पुढे पेरणीचा हंगाम आहे त्यासाठी सीसीआयची कापुस खरेदी तातडीने सुरु होणे आवश्‍यक आहे. 
कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील सर्व मोठे उद्योग बंद आहेत, कार्यालये, दुकाने बंद आहेत. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर कमी झाला आहे. दिवसा शहरांना व उद्योगांना पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतीला रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. सध्या लॉकडाउनमुळे शहरातील कार्यालये, दुकाने व मोठे उद्योग बंद असल्यामुळे बरीच वीज शिल्लक रहात आहे.

उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज जास्त असते व शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री, जिव धोक्‍यात घालुन पिकांना पाणी द्यावे लागते. सध्या शिल्लक असलेली वीज कृषिसाठी दिवसा उपलब्ध करुन दिल्यास शेतकर्यांना सुखकर होईल, असे निवेदन शेतकरी संघटनेचे अनिल घनवट यांनी सरकारला पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT