Pandharpur 
पश्चिम महाराष्ट्र

निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच पंढरपुरात प्रचाराला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे, सर्वच पक्षातील मातब्बरांनी उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजप-सेना आणि काॅंग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून नव्याने राज्यात उदयाला आलेल्या बहुजन वंचित विकास आघाडीच्या  एका कार्यकर्त्यांने पंढरपूर मतदार संघात चक्क गाडीवर पोष्टर लावून आपणालाच उमेदवारी मिळणार या आत्मविश्वासाने प्रचार सुरु केला आहे. वंचित कार्यकर्त्याच्या प्रचारामुळे निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच पंढरपुरात प्रचार सुरु झाला आहे. 

पंढरपूर -मंगळेवढा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेना नेत्या शैला गोडसे, संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी काळुंगे, जिल्हा युवक काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे यांच्यासह अनेकजण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. 

पंढरपूर मतदार संघात अजून कोणत्याही पक्षाने उमेदवारीची घोषण केली नाही. त्यामुळे ऐनवेळी कोण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवेल या विषयी चर्चा सुरु आहेत. अशातच डाॅ.प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित विकास आघाडीचे मंगळवेढा येथील कार्यकर्ते अॅड. दत्तात्रय खडतरे यांनी चक्क उमेदवारी आपणालाच मिळणार हे गृहीत धरुन मतदार संघात पोष्टर द्वारे प्रचार सुरु केला आहे. पोष्टर लावलेल्या गाड्या सध्या मतदार संघात फिरताना दिसत आहेत.

एकच निर्धार वंचित बहुजन  आघाडीचा उमेदवार, पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील जनतेच्या मनातील उमेदवार अशी घोष वाक्य लिहिले बॅनर देखील सर्वत्र झळकू लागली आहे. यावर प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर चिन्ह देखील ठळकपणे छापण्यात आले आहे. निवडणुक  आणि उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या दत्तात्रय खडतरे यांनी मतदार संघात प्रचार सुरु केल्याने इतर इच्छुकांच्या ही आशा पल्लवीत होऊ लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Pune Crime : देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार; भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

SCROLL FOR NEXT