cancellation of direct sarpanch selection 
पश्चिम महाराष्ट्र

थेट सरपंच निवड रद्दने पेडमध्ये इच्छुकांच्या आशेवर पाणी

प्रशांत केदार

पेड : राज्य सरकारने जनतेतून थेट सरपंच निवड रद्द केल्याने पेड (ता. तासगाव) येथील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे. 

पेड ग्रामपंचायतीची मुदत ही नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती ची निवडणूक ही शक्‍यतो डिसेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. फडणवीस सरकारने मागील तीन-चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा कायदा केल्याने अनेक इच्छुक आणि गेल्या एक ते दीड वर्षापासून जोरदार तयारी करत थेट जनतेतुन सरपंच होण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र नुकताच ठाकरे सरकारने जनतेतून सरपंच निवड रद्द करीत ती सदस्यातुन निवड करण्याची घोषणा नुकतीच केला आहे. 

पेड ग्रामपंचायतीसाठी एकूण पाच प्रभाग असून त्यामधून 13 सदस्यांची निवड केली जाणार आहे. जवळपास पाच हजाराच्या आसपास मतदार आहेत तसेच यावर्षी पाच प्रभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

विद्यमान सदस्यांबद्दल नाराजी 
पेड ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य असून यातील काही सदस्यांनी आपल्या गटाच्या नेत्यांना न जुमानता सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सदस्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विकासासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन नेमका कोणता विकास केला हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. याचा मोठा फटका विद्यमान सदस्यांना बसण्याची शक्‍यता आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT