Election
Election sakal
पश्चिम महाराष्ट्र

बोरगाव : उमेदवारांना पडतेय नगरसेवकपदाचे स्वप्न!

राजेंद्र हजारे

निपाणी : बेळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बोरगाव नगरपंचायतीची १७ प्रभागातील निवडणूक सोमवारी (ता. २७) अत्यंत चुरशीने झाली. नगरपंचायतीची निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवारांना आपणच नगरसेवक होणार असल्याची निकालापूर्वी स्वप्ने पडू लागली आहेत. झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा हिशोब उमेदवारांसह कार्यकर्ते करत असल्याचे चित्र दिसत आहे. गुरुवारी (ता. ३०) निपाणी येथे या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असल्याने महिला उमेदवारांना लक्ष्मी पावणार का याबद्दलही चर्चेला ऊत आला आहे.(results of all the 17 wards will be announced on Thursday)

बोरगाव येथील नगरपंचायतीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पहावयास मिळाली. मतदान झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक लढवलेल्या उमेदवारांत उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकीनंतर हे उमेदवार झालेल्या मतदानाचे गणित जुळवित आपलाच विजय निश्चित असल्याचे मानत आहेत. गुरुवारी सर्वच सतरा प्रभागाचा निकाल लागणार आहे. मतदानानंतर निकाल ३ दिवस लांबल्याने उमेदवारांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.(results of all the 17 wards will be announced on Thursday)

निवडणुकीच्या काळात मतदारांनी सर्वच उमेदवारांना तुम्हालाच मतदान करू, असे आश्वासन दिले होते. अनेक प्रभागात मतदानाची टक्केवारी चांगली आहे. त्यामुळे या प्रतिसादामुळे उमेदवाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणूक काळात सर्वच हॉटेलमध्ये गर्दी दिसून येत होती. निवडणूक संपताच गर्दी कमी झालेली आहे. अनेक उमेदवारांनी निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात उधारीवर व्यवहार केले. निवडणूक होताच उमेदवारांकडे पैशाची मागणी होत असल्याचेही दिसत आहे. निकाल लागण्यापूर्वी उधारी वसुली करण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत आहेत.(Professionals are trying to recover the debt before the result)

उमेदवारांना निकालाची चिंता

बोरगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत १७ प्रभागात लाखोंचा धुरळा उडाल्याची चर्चा आहे. यावरून भविष्यातील कोणतीही निवडणूक आता सामान्य माणसाच्या हातची नाही, हे स्पष्ट झाले. गावाच्या विकासात महत्वाची भूमिका असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत अर्थपूर्ण घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आता उमेदवारांना प्रत्यक्ष निकालाची चिंता लागली आहे.(Candidates were worried about the actual result)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: कर्णधार ऋतुराजचं शानदार अर्धशतक; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटलाही टाकलं मागे

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT