parking car.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान ! "लॉकडाऊन' मध्ये गाडी "लॉक' ठेवू नका. 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' मुळे "लॉकडाऊन' आणि संचारबंदी असताना "घरात रहा...सुरक्षित रहा' असा सल्ला दिला जातोय. परंतू सध्या तुमच्या सुरक्षेबरोबर दारातील महागड्या मोटारीची काळजीही घ्या. सध्या गाडी एकाच जागेवर असल्यामुळे तिच्या दुरूस्तीचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे "लॉकडाऊन' मध्ये गाडी सतत "लॉक' राहणार नाही याची दक्षता घ्यावा. "सोशल मिडिया' वरून याबाबत आवाहन केले जातेय. 


घरात सतत आपण झोपून राहिलो तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. तसेच काहीसे गाडीचे देखील आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी घरासमोरच दर दोन-तीन दिवसांनी गाडी जागेवर किमान दहा मिनिटे सुरू ठेवा. त्यामुळे बॅटरी डाऊन होणार नाही. तसेच गाडीच्या इंजिनला ऑईलचा पुरवठा सुरू राहील. 
एकाच जागी गाडी थांबली तर ओझ्यामुळे टायर्स कट होऊ शकतात. त्यामुळे चार-पाच फुट गाडी पुढे घ्या आणि मागे घ्या. गाडी सुरू करताना शक्‍यतो न्यूट्रल स्थितीत क्‍लच दाबून सुरू करा. 


जास्त दिवस गाडी एकाच जागी उभी असेल तर हॅन्ड ब्रेक लावू नका. त्यामुळे ब्रेक लायनर जाम होऊ शकतात. त्याऐवजी टायर्सला दगड किंवा स्टॉपर लावा. तसेच गाडी गिअरमध्ये ठेवा. दोन-तीन दिवसांनी गाडीचा दरवाजा आणि काचा काही वेळासाठी उघड्या ठेवा. गाडी सुरू करून काही काळ "एसी' चालू ठेवा. त्यामुळे कॉम्प्रेसर कुलिंग ऑईल सुस्थितीत राहील. गाडीचे बॉनेट उघडून आतमध्ये उंदीर किंवा घुशीने वायर सेन्सर डॅमेज केले आहेत काय? याचीही तपासणी करा. 


सोशल मिडियावरून हा महत्वपूर्ण संदेश दोन दिवसापासून अनेक ग्रुपवर फॉरवर्ड होताना दिसतोय. साहजिकच तो महागड्या गाड्यांच्या देखभालीसाठी महत्वपूर्ण आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT