gund-datta-jadhav
gund-datta-jadhav 
पश्चिम महाराष्ट्र

13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार,गर्भपातप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

सातारा : मोक्का कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेला प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव यांच्यावर 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणे तसेच गर्भपात केल्याप्रकरणी पोक्‍सो कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुसेगाव पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये दत्ता जाधववर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत जत येथील प्रतापपूर मध्ये त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी प्रतापसिंहनगरमध्ये घुसून दत्ता जाधवला ताब्यात घेतले. दत्ता जाधवच्या अटकेनंतर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. अटकेनंतर त्याच्यावर भुईंज येथील एका भंगार व्यवसायिकाच्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान अटकेत असलेल्या दत्तावर काल रात्री आणखी एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. "मला तुझी मुलगी आवडते, ती मला दे, अन्यथा दुसऱ्या कुणाला देवू देणार नाही, आयुष्य बरबाद करीन, जीवे मारीन अशी धमकी देत माझ्या आईला देत होता. तसेच शाळेत जाताना मला अडवून बोलायचा प्रयत्न करायचा. एक डिसेंबर 2017 रोजी तो मला व आईला कपडे खरेदीसाठी म्हणून पुण्याला घेऊन गेला. तेथील एका लॉजवर मला नेले. तेथे तीन वेळा अत्याचार केले. त्यानंतरही त्याचे अत्याचार सुरूच होते. त्यामुळे मी गर्भवती राहिले. त्यानंतर त्याने गर्भपात करायला लावले " , असे संबंधित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर तपास करत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT