पश्चिम महाराष्ट्र

डॉमिनोझ पिझ्झाच्या व्यवस्थापकासह सात जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही डॉमिनोझ पिझ्झा हे दुकान उघडे ठेवल्याने व्यवस्थापकासह सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हवालदार राहुल खाडे यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्‍यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

तरीही "डॉमिनोझ'चा व्यवस्थापक प्रशांत पाणगुडे (रा. रविवार पेठ, सातारा), सचिन मोरे (रा. स्वराजनगर, सातारा), गणेश बावलेकर (रा. पंताचा गोट, सातारा), सुरेश ढेबे (रा. राजवाडा बस स्थानकाजवळ, सातारा), मंगेश मोहिते (रा. शनिवार पेठ, सातारा), स्वाती वाटांबळे (रा. बारावकरनगर, सातारा) यांनी पोवई नाका परिसरात असलेले डॉमिनोझ पिझ्झा हे दुकान सुरू ठेवले होते. याबाबत पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी डॉमिनोझ पिझ्झा हे दुकान बंद करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

गावातच चिकनच्या पिशव्या घरपोच मिळू लागल्या आहेत 

मोदींनी अमेरिकेसमोर लोटांगण घातलं; पृथ्वीराज चव्हाणांनी सोडलं टीकास्त्र

आज हम जीवीत है पर मरे हुए है म्हणत आयुष्मानने केली कविता सादर..तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू 

सातारा जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा महत्वपुर्ण निर्णय

नागरीकांनी मास्क चेहऱ्यावर परिधान करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा :  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन त्यात अधिक वाढ होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह भेट देणारे अभ्यांगत तसेच अत्यावश्यक बाबी व सेवांसाठी बाहेर फिरणाऱ्या नागरीकांनी मास्क चेहऱ्यावर परिधान करणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे.

कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.  या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढता विचारात घेता, सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, नगरपालिका, नगरपंचायत, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांनादेखील कार्यालयीन प्रवेशापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  मास्कशिवाय कोणालाही कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
 
याच धर्तीवर सातारा जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरामधून बाहेर पडतानापासून परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करताना निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाने नियमानुसार संबधितांवर कायदेशीर कारवाई करावयाची आहे, असेही आदेशात नमुद आहे.

तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करत असताना कागदपत्रे व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची  शक्यता नाकारता येत नसल्याने कार्यालयाममध्ये वेळोवेळी सॅनिटायझर अथवा हॅण्डवॉशचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! विहिरीत उडी मारून केला निषेध

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

SCROLL FOR NEXT