Cases can now be filed in court online 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत न्यायालयात आता ऑनलाइन केस दाखल करता येणार

शैलेश पेटकर

सांगली : जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावरून आता ऑनलाइन केस दाखल करण्याची प्रक्रिया (इ-फायलिंग) सुरू करण्यात आली आहे. याद्वारे एका क्‍लिकवर प्रकरणे दाखल करण्यापासून निकालापर्यंत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रथमच जिल्हा व तालुका न्यायालयांसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी विधीज्ञांना वेबीनाद्वारे दिली. या इ-फायलिंग यंत्रणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश विजय पाटील, जिल्हा न्यायाधीश डी. पी. सातवळेकर, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, वकिल संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी केले आहे. 

सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या पेपरलेस न्यायालयाच्या धोरणानुसार न्यायालयीने प्रक्रियांत बदल करण्यास सुरूवात केली आहे. न्यायालयात बदलत्या इ-तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायालयातील प्रकरणे, दावे, अपिले, अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाइन फायलिंगची माहिती वकिलांना व्हावी या उद्देशाने "इ-कोर्ट फायलिंग व इ-कोर्ट सर्व्हीसेस' या विषयावर जिल्ह्यातील वकिलांना नुकताच वेबीनार झाला. ऋषिकेश कुलकर्णी यांनी इ-फायलिंगची सविस्तर माहिती दिली. 

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर लॉकडाउनमध्ये कोणीही पक्षकार न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. "राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) तयार केलेल्या या "यूजर फ्रेंडली प्रोग्रॅम'मुळे कोणताही वकील अथवा दावा दाखल करणारा या संकेत स्थळावरून केस दाखल करू शकणार आहे.

प्रकरणे दाखल केल्यानंतर पुढील नेमलेली तारीख व प्रकरणांची माहिती एसएमएस अथवा इ-मेलद्वारे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे प्रकरणे चालविण्याची सोयही न्यायालयात उपलब्ध करण्यात आली आहे. district.ecourts.gov.in/sangli या संकेतस्थळावर ही सोय उपलब्ध आहे. ही सोय विनामुल्क आहे. प्रत्येक न्यायलायातील संगणक विभागातून पक्षकार व विधिज्ञांना तांत्रिक मदत केली जाईल. इ-फायलिंगचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT