Cause of that  young man is not a Corona, do not spread rumors
Cause of that young man is not a Corona, do not spread rumors 
पश्चिम महाराष्ट्र

त्या तरुणाचा मृत्यू कोरोनाने नाही, अफवा पसरवल्यास गुन्हा

सकाळवृत्तसेवा

जत (जि. सांगली) : शहरातील त्या तरुणाचा मृत्यू कोरोनाने झाला नसून त्याच्यात कोणतेही लक्षण आढळले नाही. त्याच्या शरीरात काविळ व रक्ताचे प्रमाण कमी होते. म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे. तरीही प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आई व वडील यांच्या सह सहा जणांना क्वारंटाईन केले जाईल.

मात्र, याबाबतची खात्री न करता सोशल मीडियावर कोरोनामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवली. अधिकृत माहिती असल्याशिवाय सोशल मीडियावर अशा खोट्या अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करू, असा इशारा जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी पत्रकार बैठकीत दिला. 

ते म्हणाले,""तालुक्‍यात बसर्गी व शहरात आलेल्या तिघांना मिरजेला नेण्यात आले असून, त्यांचाही अहवाल प्राप्त होणार आहे. लोकांनी त्या मृत तरुणाच्या बाबतीत घाबरून जाऊ नये, प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे. शहरातील वृद्ध हृदय रोग, दमा, श्वसनाचे त्रास, यासह गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून त्यांच्याबद्दल विशेष काळजी घेण्यात येणार आहे. 

प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीने आज अखेर काम करत आली आहे. यापुढे ही करत राहील. मात्र, सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे सर्वांनीच अफवांकडे दुर्लक्ष करा. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविल्यास सायबर क्राईम अंतर्गत व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमीन, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.

यावेळी तहसीलदार सचिन पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित हराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मोहिते, पोलिस निरीक्षक रामदास शेळके आदी उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT