droan camera.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान : मिरजेत घराबाहेर याल तर गुन्हा दाखल 

शंकर भोसले

मिरज (सांगली)- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरू असलेल्या काळात घोषित संचारबंदी झुगारून विनाकारण शहरभर फिरण्याची सवय लागलेल्यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल स्वतः ड्रोन कॅमे-याद्रारे लक्ष ठेवून आहेत. कॅमेरा तीनेश साठ अंशात फिरत आहे. मिरज मार्केट येथून शहरातील दोन किलोमीटरचा परिसराची तो छायाचित्रे घेऊ शकतो.

मार्केटच्या मध्यभागापासून शहरातील दोन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर सुरू असलेल्या घडामोडी सध्या कॅमे-यांत चित्रीत केल्या जात आहेत. 
ड्रोन कॅमे-याद्वारे शहरातील अनेक उपनगरातील प्रमुख चौकांचे छायाचित्र घेतली जात आहेत. आज केलेल्या ड्रोन टेहाळणीत रेवणी गल्ली, शास्त्री चौक, मिरज हायस्कूल रोड, नागोबा कट्टा, भारत नगर, शंभर फुटी, कमानवेस या उपनगरांत नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसले. गाडवे चौक, स्टेशन चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, दर्गा परिसर या परिसरात विनाकारण दुचाकी घेऊन फिरणा-यांची छायाचित्र संकलित झाली. आपर्टमेंट सोसायटीत राहणारे अनेक नागरिक अपार्टमेंटच्या गच्चीवर समुहाने थांबून दंगा मस्ती करताना आढळून आले. 


सध्या संचारबंदीची अंमलबजावणी कडक असल्याने प्रमुख मार्गांवर फेरफटका मारणा-यांची संख्या कमी झाली असली तरी शहरातील उपनगरांत त्यांचे मोकाट फिरणे सुरूच असल्याचे शहरभर फिरलेल्या ड्रोन कॅमे-यात दिसून आले. त्यामुळे आता शहर पोलिसांकडून विनाकारण फिरताना दिसलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मोहिम सुरू झाली आहे. सोसायटीतील सदनिकांत राहत असलेल्या, विनाकारण सोसोयटीच्या छतावर येऊन दंगा मस्ती करणा-यांवर देखील कारावाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. 

असा फिरतो ड्रोन 

मिरज मार्केट आणि मिशन चौकातून शहरासह शहराबाहेर असलेल्या किमान दोन किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन तो उपनगरातील प्रमुख रस्ते, चौकांची टेहळणी करतो. तो 360 अंशात फिरतो. किमान दोनशे मीटर उंच आकाशात फिरत राहतो. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणे, चौक, रस्ते व परिसरातील घडामोडींचे चित्रण होत आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT