corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान...! वांगी येथे एकास कोरोनाची लागण 

सकाळवृत्तसेवा

वांगी (सांगली)- वांगी (ता.कडेगांव) येथे 69 वर्षे वयाची व्यक्ती कोरोना "पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्तीला आठ दिवसांपासून वारंवार ताप येत होता. आशा सेविकांनी माहिती सांगितल्यानंतर दक्षता कमिटीने कडेगांवला रुग्णालयात पाठविण्याची सूचना केली होती. त्याठिकाणी स्वॅब घेतल्यावर तो पॉझिटीव्ह आला. पत्नीसह रुग्णास मिरज येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल केले आहे. प्रशासनाने तातडीने गावाला जोडणारे सर्व रस्ते तात्काळ बंद केले आहेत. 

सदर व्यक्ती कायमस्वरुपी वांगी येथे वास्तव्यास असून त्याचे कसलेही मुंबई कनेक्‍शन नाही. त्यांच्या घराजवळ मुंबईहून आलेले सर्व लोकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग संभ्रमात पडला आहे. सदर रुग्णास आठ दिवसांपासून वारंवार ताप येत होता. गावातील खासगी दवाखान्यातील उपचारास दाद न दिल्याने त्यांना संशयित म्हणून कडेगावला पाठविले होते. काल मध्यरात्रीनंतर त्यांचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला.

सुमारे 13 हजार लोकसंख्या असणाऱ्या वांगीत मागील अडीच महिने दक्षता कमिटीने चोख कामगिरी बजावल्याने गाव कोरोनापासून सुरक्षित ठेवले होते. मात्र अखेर छुप्या मार्गाने कोरोनाचा प्रवेश झाला आहे. सदर रुग्ण मागील 8 दिवसात ब-याच लोकांच्या संपर्कात आला असल्याने गावातील नागरीक भयभीत झाले आहेत. 32 जणांना होम क्वारंटाईन तर 6 जणांना संस्थात्मक कॉंरंटाईन केले आहे. 


दरम्यान प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसिलदार शैलजा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी माधव ठाकूर यांनी सकाळी गावास भेट देऊन कंटेनमेंट झोन घोषीत केला. गावातील सर्व रस्ते बंदिस्त केले आहेत. ग्रामपंचायतीने जंतुनाशक फवारणी केली. सलग पाच दिवस गावातील सर्व व्यवसाय व व्यवहार तसेच बॅंका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाने गावातील कुटुंबांचा सर्व्हे सुरु केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT