Celebrates Basveshwar Jayanti in Sangli
Celebrates Basveshwar Jayanti in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

बसवेश्‍वर जयंती उत्साहात; लिंगायत बोर्डिंगमध्ये जन्मकाळास गर्दी 

सकाळवृत्तसेवा

सांगली - शहरासह जिल्ह्यात बसवेश्‍वर जयंतीनिमित्त आज बसव नामाचा गजर झाला. श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगच्या वतीने बसव जन्मकाळसह विविध कार्यक्रम झाले. गावभागात वीरभद्र मंदिरात बसव जन्मकाळ करण्यात आला. सायंकाळी वीरभद्र मंदिरापासून पालखी मिरवणूक निघाली. विविध मंडळे, संस्थांनीही जयंती केली. 

बोर्डिंगमध्ये सनई चौघड्याच्या मंगल सुरात सोहळा झाला. सकाळी सातला पारायण झाले. बसवेश्‍वर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र केंपवाडे, सौ. शीतल केंपवाडे यांच्या हस्ते रुद्राभिषेक व वरदशंकर महापूजा झाली. दुपारी अक्कमहादेवी महिला मंडळाचे भजन झाले. दुपारी जन्मकाळ झाला. प्रभावती सबरद, प्रभावती मंदयळ्ळी, लतिका साबणे, रेखा सबरद, सविता आरळी, विमल कोल्हापुरे, शुभांगी रिसवडे, आशाताई कोरे, इंदूबाई साबणे, डॉ. जयश्री पैलवान, विमल कवलापुरे, अलका शिंदे, कुसुम शिंदे, सविता कोरे, सुलोचना मगदूम, सुरेखा मिरजकर, गिरीजाक्का बिजरगी यांनी पाळणा सादर केला. संयोजन व्यवस्थापक सतीश मदगूम यांनी केले. बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, उपाध्यक्ष दीपक खोकले, अशोक पाटील, सुनील कोरे, ईश्‍वराप्पा सबरद, महेश कर्णे, आप्पा रिसवडे, सुरेश हिडदुग्गी, अण्णा सावळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. 

गावभागात वीरभद्र मंदिरात उत्साह होता. जन्मकाळासाठी गर्दी होती. सुरेंद्र बोळाज, नगरसेवक शिवराज बोळाज यांच्या हस्ते आरती झाली. विश्‍वनाथ मगदूम, अॅड. अमोल बोळाज, अभिजित ओतारी, अवधूत रणदिवे, अनिल पाटणे, विजय आंबी, सुजाता रुग्गे, वर्षा महाजन, अनुराधा बोळाज, स्वाती बोळाज यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी वीरभद्र मंदिरापासून पालखी मिरवणूक निघाली. टिळक चौक, गणपती मंदिर, झाशी चौक, दत्त-मारुती रस्ता, केशवनाथ मंदिरमार्गे वीरभद्र मंदिराजवळ येऊन समारोप झाला. संयोजन अध्यक्ष महेश कोरे, राहुल बोळाज, सुहास बन्ने यांनी केले. 

महापालिकेत जयंती -
स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, शैलेश खोत, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT