पश्चिम महाराष्ट्र

मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त "येथे' 22 जानेवारीपासून कार्यक्रम

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे यंदा 27 जानेवारीला भगवान मार्कंडेय यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त 22 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या शोभायात्रेची सुरवात दत्तनगर येथील बोमड्याल शाळेपासून होईल. त्यानंतर साईबाबा चौक, अशोक चौक, विप्रो प्रोसेस, तानाबाना मार्ग, आंध्र दत्त चौक, मार्कंडेय रुग्णालय, साईबाबा मंदिर, जोडबसवण्णा चौक, आरकाल चौक, साखर पेठ, विजापूर वेस, पूनम गेट, सिद्धेश्‍वर हायस्कूलमार्गे पार्क चौकात आल्यानंतर या शोभायात्रेचा समारोप होईल. याठिकाणी श्री मार्कंडेय महामुनी यांच्या साडेसहा फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात येणार आहे. 

27 जानेवारीला सकाळी सात वाजता पद्मध्वजारोहण, भारतातील मार्कंडेय तीर्थक्षेत्र ठिकाणांचे प्रदर्शन, सकाळी नऊ वाजता महाआरती, दहा ते अकरा कवयित्री रेणुका बुधाराम व सहकारी यांचे पद्मवंशाभिमान या ओवीबद्ध मार्कंडेय चरित्राचे पठण, 11 ते तीन लक्ष्मीनारायण देविदास महाराज व सहकारी यांचे भजन, मार्कंडेय पुरस्कार वितरण हे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे बोध्दूल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी बाळकृष्ण मल्याळ, रेणुका बुधाराम, अनिल वासम, ऍड. श्रीनिवास कटकूर, नागेश सरगम, अमरनाथ सामल उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT