cremation_ground_ sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात ३७१ गावांना स्मशानभूमीची प्रतिक्षा

जिल्ह्यातील ३७१ गावात स्मशानभूमी नसून गावकऱ्याना खासगी जमिनीत अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत.

विनायक जाधव

बेळगाव: जिल्ह्यातील ३७१ गावात स्मशानभूमी नसून गावकऱ्याना खासगी जमिनीत अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. मागील दहा वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळत पडलेला असून शासनाकडून स्मशानभूमीसाठी जमिनीचा शोध सुरू आहे.

बंगळूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार महांतेश कवटगीमठ यांनी नुकताच हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर माहिती देताना महसूल मंत्री आर. अशोक यांनी बेळगाव जिल्ह्यात ३७२ गावामध्ये स्मशानभूमी नसल्याचे सांगितले आहे. शासनाकडून स्मशानभूमीसाठी खाजगी जमीन खरेदी करण्याचा विचार असून त्यासाठी २६ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री अशोक यांनी दिली आहे.

पण सरकारी दर पाहता खासगी जमीन मालक स्मशानभूमीसाठी जमीन देण्यास तयार नाहीत. सध्या अनेक ग्रामपंचायतींकडे सरकारी जमीन देखील उपलब्ध नाही. त्यामुळे स्मशानभूमी मिळविण्यात अडथळे येत आहेत. या समस्येमुळे स्मशानभूमी नसलेल्या गावात अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील दहा वर्षापासून शासनाकडून जिल्ह्यातील स्मशानभूमीसाठी खासगी जमीन खरेदीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी अनुदानही मंजूर केली आहे. पण जमीन मिळत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमी मात्र तयार झालेली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही, अशा ठिकाणी गावककरी खासगी जागेत किंवा स्वतःच्या शेतात मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. पण ज्यांच्याकडे शेती किंवा अंत्यसंस्कारसाठी इतर पर्यायी जागा नाही. त्यांची मात्र यात कुचंबणा होत आहे.

यात सर्वाधिक समस्या ही अनुसूचित जाती आणि जमातीमधील कुटुंबांची असून अनेक गावांत त्यासाठी जमिनीचा शोध सुरू आहे. दरवर्षी अनुसूचित जाती आणि जमातीच्या आढावा बैठकीत हा प्रश्न चर्चेला येतो. पण आजवर तोडगा काढण्यात आलेला नाही. बेळगाव जिल्ह्यात ८१६ स्मशानभूमी आहेत. जेथे ग्रामपंचायतींच्या अनुदानातून तसेच रोजगार हमी योजनेतून विकास कामे राबवले जात आहेत. स्मशानभूमीची सर्वाधिक समस्या ही खानापूर तालुक्यात आहे. याठिकाणी तब्बल १०६ गावामध्ये स्मशानभूमी नाही. तर बेळगाव तालुक्यात ही समस्या कमी असून केवळ २ गावांसाठी स्मशानभूमीचा शोध घेतला जात आहे.

तालुकानिहाय स्मशानभूमी नसलेली गावांची संख्या

तालुका स्मशाभूमी नसलेली गावे

खानापूर १०६

बेळगाव २

हुक्केरी ५३

बैलहोंगल ४२

रामदुर्ग २९

कित्तूर २२

गोकाक ६२

सौन्दत्ती २

मुडलगी १६

चिकोडी १२

निपाणी ३

अथणी ५

रायबाग १८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT