Census training will be provided to the teachers 
पश्चिम महाराष्ट्र

उन्हाळ्यात गुरुजी करणार आता हे काम...

राजेंद्र हजारे

निपाणी - जिल्ह्यात जनगणना मेमध्ये सुरू होणार आहे. मोबाईल, टीव्ही, वाहन, शौचालयासह ३४ मुद्यांचा त्यामध्ये समावेश राहणार आहे. याचवेळी घरगणनाही करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुजींना यंदाच्या उन्हाळ्यात काम करावे लागणार आहे.

१ मे ते १५ जूनदरम्यान ही गणना होणार

प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्याकडून शिक्षकांना जनगणनेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी न येणाऱ्या शिक्षकांवर शासनाच्या नियमानुसार कारवाईही होणार आहे.
जनगणना व घरगणना अशा दोन प्रकारे शिक्षकांना काम करावे लागणार आहे. त्यासाठी ॲप विकसित केले आहे. नाव, पत्ता, मोबाईल, शौचालय, लॅपटॉप, वाहन यांची माहिती काही मिनिटांतच भरली जाणार आहे. १ मे ते १५ जूनदरम्यान ही गणना होणार आहे. घराची गणना करताना घर कसे आहे, साधे की पक्के आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे घरी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी कुटुंबातील सर्व माहिती बिनचूक देण्याचे आवाहन केले आहे.

राज्याच्या महसूल विभागातर्फे जनगणना करण्यात येणार आहे. त्या सोबतच आता घरगणनाही होणार आहे. या बाबतची सूची तयार करण्यात आली असून मे महिन्यापासून घरोघरी जाऊन जनगणना व घरगणना करण्यात येणार आहे
- रवींद्र करलिंगन्नावर,
प्रांताधिकारी, चिक्कोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT