gang of six people caught in kavtemhakal sangli crime news marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

मांडूळ विक्रीसाठी आलेल्या सहा जणांची टोळी पकडली; कवठेमहांकाळ पोलिसांची कारवाई

Gorakh Chavan

कवठेमहांकाळ (सांगली) : खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करून अवैधरित्या दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विकरणारी टोळी पोलिसांनी पकडली. सापाची विनापरवाना विक्री केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.शहरापासून जवळच मेघराज मंदिराजवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. टोळीकडून तीन मांडूळ जप्त करण्यात आले.

त्यांची अंदाजे किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. मांडूळ विक्री करणारी टोळी मेघराज मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलीस नाईक आमीरशा फकीर यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, शिवाजी करे, पोलीस हवालदार दीपक गायकवाड, संजय चव्हाण, आण्णासो भोसले, चंद्रसिंग साबळे, प्रशांत मोहिते, वनपाल अधिकारी आर. आर. चौगुले, वनरक्षक अधिकारी डी. एस. बजबळकर यांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.

त्यातील तिघे सोलापूर, दोघे कोल्हापूर व एक बेळगावचा आहे. गजानन वसंत सरगर, संजय अशोक ओलेकर, तीप्पाण्णा म्हाळाप्पा तडवळे (सर्व सलगरे खुर्द, जि. सोलापूर), महादेव मनोहर बेनाडे, युवराज दत्तात्रय मगदूम (इचलकरंजी, जि. कोल्हापूर) तर वाहन चालक विवेक राजेंद्र बेनाडे (डोणेवाडी, जि. बेळगाव) यांच्या ताब्यातील वायरच्या पिशवीतून तीन दुर्मिळ साप (मांडूळ) विनापरवाना बाळगल्याने ताब्यात घेतले. या सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment Youth Death : पोलिस भरतीवेळी धावताना सांगलीच्या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; 1600 मीटरची 'ती' धाव ठरली शेवटची, खाकीचं स्वप्न उराशी, पण...

HSC Exam : कुणी फोडली १२वीची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका? नागपूर पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, खासगी शिकवणीशी संबंध उघड

National Highway Crime : पुणे-सोलापूर हायवेवर रक्ताचा सडा! दुचाकीला पिकअपची धडक अन् कोयत्याने सपासप वार; साडेचार वर्षांनंतर घेतला दुहेरी खुनाचा बदला?

SSC Exam : शिक्षणासाठी दुसरी इनिंग सुरू! कासारवाडीतील २१ महिलांनी दिला दहावीचा पहिला पेपर

Bigg Boss Marathi 6 : ना दीपाली ना रुचिता बिग बॉस मराठीच्या घरातून 'या' सिंगरची एक्झिट !

SCROLL FOR NEXT