पश्चिम महाराष्ट्र

आता माघार नाही; ओबीसींच्या हक्कासाठी 26 जूनला चक्काजामच

सदाशिव पुकळे

झरे (सांगली): महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींमध्ये अत्यंत संतप्त भावना आहेत. आरक्षणाचं हे न्यायालयीन पातळीवर लढले जात असताना केवळ राज्य सरकारने प्रभावी बाजू न मांडल्याने आणि केवळ वेळकाढूपणा केल्यामुळे हे आरक्षण गेले आहे.(chakkajam-in-the-sangli-district-on-June-26-for-the-right-of-obc-sangli-news)

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक आज विरोधीपक्ष नेते . देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. यामध्ये सर्वांगीण चर्चेनंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू आणि आवश्यकतेनुसार न्यायालयात जाऊ, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

मुंबईमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये चक्काजाम करणार असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिनांक 26 रोजी चक्काजाम आंदोलनासाठी कार्यकर्त्‍यांनी तयारीत राहावे असे आवाहन केले आहे.मुंबई मध्ये झालेल्या बैठकीला ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष .योगेशजी टिळेकर, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, चंद्रशेखरजी बावनकुळे, . गिरीशजी महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजयजी कुटे, मनिषाताई चौधरी, आ.जयकुमार गोरे, चित्राताई वाघ आणि अन्य सहकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT