undawadi
undawadi 
पश्चिम महाराष्ट्र

शिरसाईच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे चक्री उपोषण व भजन आंदोलन उंडवडीत सुरु

विजय मोरे

उंडवडी - जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभार्थी दुष्काळी भागाला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून (31) लाभार्थी शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार (बारामती) येथे उपोषण व भजन आंदोलन सुरु केले आहे. 

बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर या भागाला वरदान ठरत असलेल्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून 

पाणी सोडून आवर्तन द्यावे. या मागणीसाठी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) येथील बारामती - पाटस वरील बस स्थानकाजवळ उपोषण व टाळ, मृदूंग वाजवून भजन सुरु केले आहे. जो पर्यंत योजनेतून पाणी सोडले जात नाही. तो पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाकडे निवेदन देवून 28 जानेवारी पर्यंत पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

त्यानुसार आज उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, जराडवाडी, सोनवडी सुपे, खराडेवाडी, जळगाव सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, अंजनगाव, गोजुबावी, बऱ्हाणपूर आदी गावातील सरपंच, उपसरपंच आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

याबाबत उंडवडी कडेपठारचे माजी सरपंच विठ्ठल जराड व उंडवडी सुपे उपसरपंच पोपट गवळी म्हणाले, "जो पर्यंत आमच्या हक्काचे योजनेचे पाणी सोडले जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. उपोषण चक्री असणार आहे. तसेच दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु ठेवणार आहे. " 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT