film
film 
पश्चिम महाराष्ट्र

नाट्यपंढरीची दिंडी आता चित्रपटाकडे वळणार 

अजित झळके

सांगली . ः कोरोना विषाणूच्या संकटातून रोजगाराच्या, गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. नाट्यपंढरी म्हणून कोरडा लौकिक मिरवणाऱ्या सांगलीत यानिमित्ताने सिनेमा आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्याची संधी चालून आली आहे. 


कोल्हापूरने त्यात आघाडी घेतली, आता सांगलीला उशीरा का असेना त्या पावलावर पाऊल टाकण्याची संधी चालून आली आहे. मुंबईतून पश्‍चिम महाराष्ट्राकडे केंद्रस्थान सरकत असलेल्या या "ग्लॅमर उद्योगा'ला आकर्षित करावे लागेल. सिनेसृष्टीला आकर्षित करणाऱ्या बहुतांश गोष्टी येथे आहेत, गरज आहे फक्त कवाडे खुली करण्याची. त्यासाठी राजकीय आणि कला क्षेत्राचा पुढाकार आणि समन्वय गरजेचा आहे. 


मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. तेथे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण किती काळ लांबणीवर पडेल, याचा याघडीला अंदाज नाही. ही इंडस्ट्री आता थांबणार नाही. ती नव्या वाटा शोधते आहे. त्या वाटेवर कलानगरी कोल्हापूरने पहिला हक्क सांगत सर्व तांत्रिक बाजू भक्कम करून घेतल्या आहेत. त्यासाठी स्थानिक नाट्यकर्मी आनंद काळे यांनी पुढाकार घेतला. प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले, प्रवीण तरडे, आदेश बांदेकर, सुबोध भावे आदींनी मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला आणि कोल्हापूर आता चित्रीकरणासाठी सज्ज होत आहे. आता थोड्या उशिराने का असेना सांगलीतील कलाक्षेत्राला जाग यावी, अशी अपेक्षा आहे. 


सांगलीत याआधीही अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. काही मालिकांचे चित्रीकरण येथे सुरू होते, मात्र कोरोना संकटामुळे ते थांबले आहे. या जुन्या मालिका आणि नव्या मालिका सिनेमांच्या चित्रीकरणाला मान्यतेसह या क्षेत्राचे स्वागत करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी येथील युवा निर्माते सागर पाठक यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली आहे. 


हे आहे बलस्थान 

* सांगलीत हॉटेलिंग उत्तम 
* युवा आणि ज्येष्ठ कलाकरांची ही खाण 
* निर्मिती, दिग्दर्शनातील जाणते लोक 
* चित्रीकरणासाठी आदर्श लोकेशन 
* राज्यात ताकद असलेले राजकीय नेतृत्व 
* नाट्यपंढरीला पुन्हा बहर यावा अशी संधी 

प्रशासनाची मान्यता महत्त्वाची 


सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सशर्त मान्यता आवश्‍यक आहे. त्यात येथे येणाऱ्या कलाकारांची कोविड टेस्ट केली आहे का इथपासून ते सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाईल इथंपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. कोल्हापुरात चित्रीकरणाला मान्यता घेताना या गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीत चित्रीकरणासाठी पायघड्या घालताना फार कसरत करावी लागणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT