पश्चिम महाराष्ट्र

सेट परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात चंदगडी भाषेचा समावेश

सुनील कोंडुसकर

चंदगड - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राज्य स्तरावरील सेट परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात चंदगडी भाषेचा समावेश केला गेला आहे. दोन वर्षापूर्वी या भाषेचा दहावीच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. त्यानंतर राज्यस्तरीय सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी निवड केल्याने या भाषेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

कोकणी आणि कर्नाटकी हेल काढून बोलली जाणारी ही चंदगडी भाषा अन्य भाषेपेक्षा वेगळी आहे. तिची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. सावंतवाडी, दोडामार्गच्या सीमेपासून ते बेळगावच्या सीमेपर्यंत आणि चंदगडला लागून असलेल्या आजरा व नेसरी परिसरातील गावात ही भाषा बोलली जाते.

राज्य परीक्षा महामंडळावर काम करताना डॉ. नंदकुमार मोरे यांनी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात या बोली भाषेचा समावेश केला. त्यानंतर अलीकडेच देशपातळीवर झालेल्या भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणात डॉ. मोरे यांनीच या भाषेवरील दीर्घ नोंद लिहिल्यानंतर तिचा शिक्षण क्षेत्रातील प्रवेश सुकर झाला. जागतिक दर्जाच्या ‘ओरिअंट बॅक्‍सवन’ प्रकाशन संस्थेने या भाषेचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला असून जगभरातील विद्यापीठांमध्ये ती अभ्यासासाठी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठांनीही तिचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. राज्य शासनाने मराठी पाठ्यपुस्तक आणि लोककलांच्या संकलन प्रकल्पाच्या निमित्ताने ही बोली मराठीची अधिकृत बोली असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, यूजीसी ही देशातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यांच्याकडून प्राध्यापक पदासाठी वर्षातून दोन वेळा देश पातळीवर ‘नेट’ तर राज्य पातळीवर ‘सेट’ परीक्षा घेतली जाते. त्यासाठी या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू केला असून त्यात चंदगडी बोली भाषेचा समावेश करण्यात आल्याने तिचा मान वाढला आहे. चंदगडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

चंदगडीला स्वतंत्र दर्जा..
अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, भिलाऊ, झाडी, वऱ्हाडी, पाटी, भिल्ली, डांगी, दखनी या प्रमाणेच चंदगडी ही सुद्धा स्वतंत्र बोली असल्याचे या सर्वेक्षणातून सिद्ध झाले असून या भाषेचा स्वतंत्र दर्जा मान्य झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT