Chandoli Dam sakal
पश्चिम महाराष्ट्र

Chandoli Dam : ‘चांदोली’ धरण ५० टक्के भरले

१ ते ७ जुलै अशी पावसाने जोरदार मुसळधार अतिवृष्टी केल्याने चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

सकाळ वृत्तसेवा

वारणावती - चांदोली हे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे धरण आहे. चांदोली धरण परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते, म्हणून या परिसराला ‘मिनी कोकण’ संबोधले जाते. अशा चांदोली धरण परिसरात १ जुलैनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने चांदोली धरण पन्नास टक्के भरले आहे.

या वर्षी पावसाला उशिरा सुरवात झाली, शिवाय जूनअखेर पुरेसा असा पाऊस पडलाच नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नव्हती. मात्र १ जुलैनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने आठवडाभर उघडीप दिली नाही.

१ ते ७ जुलै अशी पावसाने जोरदार मुसळधार अतिवृष्टी केल्याने चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ३० जून रोजी १० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मात्र १ जुलैनंतर ७ जुलैपर्यंत ५ टीएमसी पाणीसाठ्याची वाढ होऊन धरणातील पाणीसाठा १५.८५ टीएमसी झाला होता.

पावसाने त्यानंतर उघडीप दिली आहे. मात्र धरणात पाण्याची आवक सुरू होती त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसाठा १७.२५ टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी ५०.१५ आहे.चांदोली धरण हे सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतीला वरदान ठरत आहे. प्रतिवर्षी हे धरण शंभर टक्के भरले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT