Chandoli dam area 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Earthquake: सांगली हादरलं! चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के; वारणा धरणाला धोका आहे का? प्रशासनाने दिली अपडेट

Chandoli dam area in Sangli earthquake: भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून आठ किलोमीटर अंतरावर होता. सकाळी ४ वाजून ४६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

कार्तिक पुजारी

Sangli Earthquake: सांगलीमध्ये चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. सकाळी पाच वाजताच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवला. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून आठ किलोमीटर अंतरावर होता. सकाळी ४ वाजून ४६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक नागरिक भीतीच्या छायेत आहेत. चांदोली धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरु आहे. भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे चांदोली धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण प्रशासनाने सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. त्यामुळे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. याच दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणती मोठी दुर्घटना घडलेली नाही. धरण प्रशासनाने देखील काळजी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. माहितीनुसार, शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरापासून आठ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते.

पाऊस सुरु असल्याने चांदोली धरणाच्या पातीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासनाने नागरिकांना अश्वस्त केलं आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने कसलाही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात देखील अशाच भूकंपांची नोंद झाली आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना या चार जिल्ह्यांमध्ये ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. हवामान विभागाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी भूकंप आणि पाऊस यांचा संबंध सांगितला आहे. जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात तेव्हा जास्त पावसाची शक्यता असते, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT