Warana River Water sakal
पश्चिम महाराष्ट्र

Warana River Flood : वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पिके गेली पाण्याखाली

चांदोली धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वारणा काठाची पिके पाण्याखाली गेली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिराळा - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून चांदोलीत पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. धरणात १२३९८ क्यूसेसने पाण्याची आवक सुरु आहे. २४ तासात चांदोलीत ५७ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

चांदोली धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वारणा काठाची पिके पाण्याखाली गेली आहेत. धरणाच्या सांडवा पातळीस पाणी आल्याने धरणाच्या जलाशय परिचालन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून उद्या सकाळी सांडव्यावरून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वारणा काठला सावधानतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

आज पावसाचा जोर कालच्या पेक्षा कमी आहे. असला तरी अधून मधून पावसाची संततधार सुरु आहे. सायंकाळी चार वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६१९.१० मीटर आहे. पाणीसाठा ७७१.१०० दलघमी असून २७.२३ टी.एम.सी म्हणजे ७९.१५ टक्के पाणीसाठा आहे.

सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी या २४ तासात ५७ मी.मी तर मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आठ तासात २० मी .मी .अशा एकूण ९४९ मी. मी.पावसाची नोंद झाली आहे. कोकरूड ते रेठरे, मांगले -सावर्डे, शिराळे खुर्द- माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.

शिराळा तालुक्यात मंडल निहाय मी.मी. मध्ये पडलेला पाऊस

कोकरूड - ३७.५

शिराळा १७.८

शिरशी १७.८

मांगले- १७.८

सागाव २०.५

चरण - ३७.८

धरण क्षेत्रातील पर्जन्यमापक यंत्रावर झालेली नोंद

पाथरपुंज १८३ (२०९८)

निवळे ४० (२१७३)

धनगरवाडा ६८ (१२४६)

चांदोली ५७ ( ९२९ )

मध्यम प्रकल्प व लपा तलाव पाणीसाठा टक्केवारी

मोरणा धरण -७९ .

ल.पा.तलाव वाकुर्डे -१००

ल.पा.तलाव अंत्री बुद्रुक- ७४

ल.पा.तलाव शिवणी -४२

ल.पा.तलाव टाकवे -३६

ल.पा.तलाव रेठरे धरण -२

ल.पा.तलाव कार्वे -०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख करताच सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; शहा, राजनाथ सिंहसुद्धा आक्रमक

आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'

Jal jeevan Yojana : जलजीवनचा 'कोरडा' थाट! बिले कंत्राटदाराच्या खिशात, पण जांभूळपाड्याच्या नळाला पाणीच नाही

Valentines Day Special Recipe: 'व्हॅलेनॉटाइन्स डे'ला तुमच्या जोडीदारासाठी बनवा खास चॉकलेट बिस्कीट केक, अगदी सोपी रेसिपी आहे!

Pune News: शेणापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक कलात्मक वस्तू सातासमुद्रापार; मानसी व सायली निघोटबहिणींनी उभारला हक्काचा व्यवसाय!

SCROLL FOR NEXT