पश्चिम महाराष्ट्र

सरकारी नोकरी नावाची संकल्पना काढून टाका

सकाळवृत्तसेवा

सांगली -  युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्‍यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खासगी नोकरीतूनही पैसा मिळतो. त्याची योग्य गुंतवणूक करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

शहरातील कल्पद्रुम क्रीडांगणावर महापालिकेच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मोफत नोकरी व कौशल्य प्रशिक्षण नोंदणी शिबिर झाले. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम झाला.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, धीरज सूर्यवंशी, मकरंद देशपांडे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, विनायक सिंहासने, भारती दिगडे उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ‘‘रस्ते म्हणजे विकास नाही, तर माणसांचा विकास झाला पाहिजे. बेरोजगारी संपत नाही तोवर विकास झाला, असे म्हणता येणार नाही. ती संपवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. खासगी नोकरीतून लगेच काढत नाहीत, तशी भीती बाळगू नये.’’

महापौर संगीता खोत म्हणाल्या, ‘‘आजच्या मोफत नोकरी मेळाव्यातून पाचशेजणांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे मेळावा यशस्वी झाला, असे म्हणता येईल. यापुढेही महापालिकेच्या माध्यमातून असे मेळावे आयोजित केले जातील.’’ शिबिरात सुमारे ५० उद्योजक, व्यापारी, कंपन्या सहभागी झाल्या. नोकरी मिळालेल्या निवडक उमेदवारांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

आरोपांची काळजी करू नका
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल होत असलेल्या आरोपांकडे लक्ष न देण्याची सूचना केली. ते म्हणाले, ‘‘खूप आरोप त्यांच्यावर होत आहेत; मात्र त्यांनी काळजी करू नये. काम करत राहावे. शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शहर विकासाचा प्लॅन करा. पथदिवे बसवा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT