विक्रम पाटील sakal
पश्चिम महाराष्ट्र

विकासकामात अडथळा करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल: विक्रम पाटील

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : इस्लामपूरच्या (Islampur) विकासकामात अधिकारी अडथळा आणत असतील तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा भाजपचे नेते व विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील (Vikaram Patil) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrkant Patil) यांच्या हस्ते रविवारी (ता. २४) दुपारी दोन वाजता येथील प्रभाग पाचमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण समारंभ आयोजित केला आहे. त्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत प्रभागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे. कोणत्याही कामासाठी अर्ज करावा लागणार नाही, मागणी करावी लागणार नाही आणि काम अपूर्ण राहिले तर मतसुद्धा मागायला येणार नाही, असे सांगितले होते. गेली वीस वर्षे ज्या भागात रस्ते, गटारीयासह मुलभूत सुविधा नव्हत्या, त्या प्रभागात उच्चांकी निधी मंजूर करून आणला आहे. स्व. अशोकदादांनी वीस वर्षांपूर्वी रस्ते निर्माण केले होते. त्यानंतर प्रथमच या परिसराचा विकास करण्याची संधी मिळाली. आठ कोटीहून अधिक निधी आणला. आणखी दीड कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. या सर्व कामांचा लोकार्पण होणार आहे."

ते म्हणाले, "ज्यांना भुयारी गटार योजना मंजूर करता आली नाही, ती आम्ही केली. १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. फडणवीस सरकारच्या काळात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र लाभार्थ्यांना १४ कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिले. अन्यायकारक आराखड्याच्या विरोधात आंदोलन करून अन्यायकारक आरक्षणे काढण्यात यश मिळवले. नगरपालिकेच्या इतिहासात भाजी मंडईच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्वीपासून आमच्यासोबत राहून साथ दिलेल्या कार्यकर्त्यांचाही सन्मान होणार आहे. महाराष्ट्रात सत्ता बदलल्यानंतर आता विकासकामात जे अधिकारी अडथळा आणतील त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल."

ते म्हणाले, "रविवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते विविध कामांचे लोकार्पण होईल. माजी आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्ष आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सुरेश खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, वैभव पवार, गौरव नायकवडी, पै. भीमराव माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. नागरिकांनी उपस्थित राहावे." यावेळी सुशांत पाटील, संदीपराज पवार, भगवानराव जाधव, भास्करराव कांबळे, सागर पाटील, रियाज आगा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT