पश्चिम महाराष्ट्र

कडेगावात होळीच्या निमित्ताने अनिष्ठ प्रथेचे 'दहन'

संतोष कणसे

कडेगाव - येथील पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी आवाहन केले अन् होळीच्या दुसऱ्या दिवशी लोकांना राखेचे गोळे मारणे व पैसे मागण्याची शहरांतील अनिष्ठ प्रथा बंद झाली. तर होळीच्या निमित्ताने श्री. हसबनीस यांचे प्रयत्नामुळे या अनिष्ठ प्रथेचे 'दहन' झाल्याने त्यांचे शहरांत सर्वत्र कौतुक होत आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांना होळीच्या राखेचे गोळे मारणे, वाहने अडवून पैसे मागणे अशा घटना घडत असत. यातून दरवर्षी वादाचे व मारामारीचे प्रकार घडत होते. तसेच मुलांमध्ये चुकीचे संस्कार रुजण्याचा धोका निर्माण झाला होता. दरवर्षी प्रमाणे आज होळीच्या दुसऱ्या दिवशी शहरात काही तरुण मुलांकडून राखेचे गोळे लोकांना मारणे व वाहनधारकांना अडवून त्यांचेकडून पैसे काढणे असा प्रकार सकाळी आठच्या सुमारास सुरु होता. 

कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हसबनीस यांना हा चुकीचे प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी शहरांतील सर्व तरुणांना असा प्रकार करु नये, असे आवाहन केले. या प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक चौका - चौकात पोलीस बंदोबस्त लावला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा चुकीचा प्रकार बंद झाला.

शहरातील तरुणांकडून होळीच्या दुसऱ्या दिवशी राखेचे गोळे करुन ते लोकांना मारणे व पैसे घेणे असे प्रकार घडत असत. गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या या अनिष्ठ प्रथेमुळे अनेकवेळा भांडणे व मारामारीचे प्रकार घडत. परंतु पोलिसांनी आता ही अनिष्ठ प्रथा बंद करुन चांगला पायंडा पाडला आहे.
- माणिकराव देशमुख,
सामाजिक कार्यकर्ते कडेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT