पश्चिम महाराष्ट्र

फेसबूकवरून बुलेट खरेदी पडली महागात

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : फेसबूक खाते उघडून पाहत असताना त्यावर बुलेट विक्रीची पोस्ट पाहिली. 70 हजार रुपयांत बुलेट मिळणार म्हटल्यावर शिवराज हणमंत कोटगी (रा. ओम गर्जना चौक) यांनी त्या व्यक्‍तीशी संपर्क केला. आर्मीत नोकरीला असल्याचे सांगून शिवराज यांना संशयित आरोपीने बनावट कागदपत्रे पाठविली. त्यावर विश्‍वास ठेवून शिवराज यांनी एक लाख 39 हजार 200 रुपये दिले. मात्र, संशयित आरोपीने बुलेट दिली नसल्याने शिवराज कोटगी यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. 

गुगल पे वरील गणेशलाल घमेटी बी 8696195746, 8696138691 व 8094815894 या क्रमांकाचा वापर करणाऱ्या युवकाने फसवणूक केल्याची फिर्याद शिवराज कोटगी यांनी दिली आहे. बुलेटची किंमत (एमएच 13, सीआर 0130) 70 हजार रुपये असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती. मात्र, हा व्यवहार 65 हजाराला ठरला. संशयित आरोपीच्या फेसबूक डिपीवर इंडियन आर्मीचा लोगो होता. आरोपीशी संपर्क झाल्यावर त्याने सांगितले, मी पुणे येथे कमांडो म्हणून नोकरीस होतो आणि आता माझी बदली नागपूरला झाली आहे. मी मूळचा गोंदियाचा असून आता माझी परिस्थिती खराब असल्याने सोलापुरात राहायला येणार आहे. त्याच्यावर विश्‍वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र, आरोपीने बुटेल दिलीच नाही, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

व्हॉटस्‌ऍपवर साधला संपर्क 
बुलेटचा मूळ मालक रुद्रमुणी हिरेम्मा यांच्या नावाचा वापर करुन संशयित आरोपीने आरसी बूक, भारत सरकारच्या सीआयएसएफचे ओळखपत्र बनावट तयार केले. त्यावर युनिफॉर्म घातलेला फोटो होता. आधार कार्डही बनावटच तयार केले. कागदपत्रे पाहून शिवराज कोटगी यांनी समोरील व्यक्‍तीला रक्‍कम दिली. मात्र, त्याने सर्व संपर्क व्हॉटस्‌ऍपवरुनच केला. या प्रकरणाचा पुढील तपास आता सहायक पोलिस निरीक्षक शेटे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT