cheating for police wife in miraj 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिस पत्नीचीच 95 हजारांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा

मिरज : शहरातील वखारभाग परिसरात राहणाऱ्या साधना गजानन घुमे या पोलिस पत्नीची तब्बल 95 हजारांची फसवणूक झाली. ""ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतो आहे,'' असे सांगत भामट्याने साधना घुमे यांच्याकडून क्रेडिट कार्डचे सर्व तपशील घेऊन या क्रेडिट कार्डवर तब्बल 95 हजारांची खरेदी केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे साधना घुमे यांच्या लक्षात आले. 

या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की साधना गजानन घुमे यांचे पती गजानन घुमे हे 29 वर्षांपासून सांगली जिल्हा पोलिस दलात सेवेत आहेत. साधना या त्यांच्या सासुबाईंना डायलिसिस उपचारासाठी आज सकाळी वॉनलेस रुग्णालयात घेऊन गेल्या. यावेळी त्यांना रुग्णालयातच ऍक्‍सिस बॅंकेतून बोलतो आहे, असे सांगत बॅंकेच्या नवीन आलेल्या क्रेडिट कार्डविषयी चौकशी केली. यावेळी त्यांनी हे कार्ड पतींच्या नावे असल्याचे आणि ते घरी असल्याचे सांगितले. दुपारी तीन वाजता फोन करा, असेही त्या म्हणाल्याने भामट्याने दुपारी तीन वाजता अचूकपणे फोन करून कार्डाचा सर्व तपशील घेतला आणि ओटीपी नंबर मिळताच काही क्षणात तब्बल 95 हजारांची खरेदी या कार्डवरून केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घुमे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. 
 
भामट्याचा मोबाईल क्रमांक 
एटीएम, क्रेडिट कार्ड विषयी कोणत्याच बॅंकेतून ग्राहकास दूरध्वनी केला जात नाही. आज 95 हजारांची फसवणूक झालेल्या प्रकरणातील मोबाईल क्रमांक 9540117643 असा आहे. पोलिसांनी आता या नंबररून चौकशी सुरू केली असली तरी अशा घटनांपासून सावध रहावे. असे आवाहन सायबर सेलच्या आधिकाऱ्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT