Check post in Sangali for immigrants 
पश्चिम महाराष्ट्र

परदेशावरून येणाऱ्यासाठी इथे चेक पोस्ट 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः परदेश वारी करून तसेच होम क्वॉरंटाईनचा स्टॅंप लावलेल्या व्यक्ती 
पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असल्यास, अशा प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात पेठ, अंकली, कडेगाव व नागज येथे तत्काळ चेक पोस्ट सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिल्या आहेत. दरम्यान, बॅंकांमधील गर्दी टाळून एटीएम, इंटरनेटचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने वाहतूक आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ""प्रत्येक चेक पोस्टवर संबंधित ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शिफ्टमध्ये आरोग्य विभागाचे दोन, पोलिस विभागाचे दोन व आरटीओ विभागाचा एक कर्मचारी या प्रमाणे तीन शिफ्टमध्ये आवश्‍यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. चेक पोस्टवर नियुक्त करण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. याप्रमाणेच रेल्वे विभागानेही मिरज, सांगली रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आवश्‍यक पथक नेमावीत. नियुक्त करण्यात आलेली पथके 24 तास कार्यरत ठेवावीत.'' 

बॅंकात होणारी अनावश्‍यक गर्दी टाळावी

बॅंका अत्यावश्‍यक सेवा प्रकारात येत असल्याने बॅंकांची शाखा कार्यालये ग्राहकांसाठी खुली राहणार आहेत. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बॅंकात होणारी अनावश्‍यक गर्दी टाळावी. ग्राहकांनी बॅंकेत येण्यापेक्षा इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा. जिल्ह्यात एकूण 30 बॅंका कार्यरत असून 483 शाखा आहेत. 

-  डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT