Miraj Eskal
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत गाड्यांवर दगडफेक: कानडी फलकांची नासधूस; 9 जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी ही राडेबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या नऊ पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ डिजिटल टीम

मिरज : बेंगलोरमधील (Bengalur) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद मिरज (Miraj)शहरात उमटले. यामध्ये शहरातील शिवसेनेच्या (Shivsena) शहर कार्यकारीणीमधील पदाधिका-यांनी कर्नाटकातून (Karnataka)आलेल्या आणि हॉटेल मधुबनसमोर थांबलेल्या खाजगी गाड्यांवर दगडफेक करून त्यांची मोडतोड केली. यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचवेळी बस स्थानक परिसरातील रुग्णालये, दुकानांसमोरील कानडी फलकांचेही जमावाने नुकसान केले.

पोलिसांनी ही राडेबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या नऊ पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणि त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शिवसेनेचे शहर अध्यक्ष चंद्रकांत रामू मैगुरे (वय 42 वखार भाग मिरज) शिवसेनेचे शहरप्रमुख विजय चंद्रकांत शिंदे (वय 40, रा. दत्त कॉलनी) माजी उपशहरप्रमुख किरण धोंडीराम कांबळे (वय 33) उपशहर प्रमुख पप्पू शिवाजी शिंदे (वय 42,रा. दत्त कॉलनी) उपशहरप्रमुख महादेव भागोजी हुलवान (वय 31, रा. धनगर गल्ली, मिरज) उपशहर प्रमुख अतुल अनिल रसाळ साळवे (वय 39, नदीवेस, मिरज) गजानन धोंडीराम मोरे (वय 45, रा. जिलेबी चौक), विभाग प्रमुख दिलीप बाबू नाईक (वय 39, रा. रेवणी गल्ली) आणि प्रकाश शिवराम आहिरे (वय 40, रा. पाटील गल्ली) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT