Accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

चिक्कोडी : चाँद शिरदवाड येथील अपघातात मुगळीचा युवक ठार

चाँद शिरदवाड येथील बसस्थानकानजीक गुरुवारी (ता. १७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुभाजकाला दुचाकी धडकली.

गजानन पाटील

बेडकिहाळ : चाँद शिरदवाड येथील बसस्थानकानजीक गुरुवारी (ता. १७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुभाजकाला दुचाकी धडकली. त्यात एकजण जागीच ठार झाला. सुधीर नागप्पा मादीग (वय २५, रा. मुगळी, ता. चिक्कोडी) असे मयत युवकाचे नाव आहे. (Chikkodi Accident One Death)

याबाबत अधिक माहिती अशी, चिक्कोडीहून बोरगावकडे होंडा कंपनीची सीबी-शाईन दुचाकी (केए २३ इएस ८०५८) घेऊन मुगळी (ता. चिक्कोडी) येथील युवक सुधीर नागप्पा मादीग (वय २५) हा वेगाने निघाला होता. दुभाजकाला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सुधीर हा पेंटर काम करून उपजिवीका करत होता. रात्री बसस्थानकावर अपघात होताच नागरिकांची गर्दी झाली होती. घटनास्थळी सदलगा पोलिसांनी भेट दिली.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र अज्जन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेची नोंद सदलगा पोलिस स्थानकात झाली आहे. रात्री सदलगा आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT