मलिकवाड : बसस्थानक आवारात बसमध्ये चढण्याची कसरत करताना विद्यार्थी. sakal
पश्चिम महाराष्ट्र

चिक्कोडी : ग्रामीण विद्यार्थ्यांना बससेवेची अडचण

ताटकळत राहण्याची वेळ; पुरेशा बस सोडण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : दोन महिन्यापासून शाळा-महाविद्यालये नियमितपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे दररोज शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र आगारातून वेळेवर बसेस नाहीत. येणाऱ्या बसही खचाखच भरून येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाचढण्याची अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्याना इतर बसने येण्याच्या सूचना मिळत आहेत. त्यामुळे वेळेवर शाळेमध्ये पोहचणे अशक्य झाल्याने विद्यार्थ्यातून निराशा व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्ग कमी झाल्याने शाळेना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चिक्कोडी शहरास जावे लागते.

सध्या शाळा दहा ते पाच वाजेपर्यंत असल्याने सकाळी वेळेत नियमितपणे पोहचण्याची धावपळ सुरू असते. मात्र विद्यार्थी बसस्थानकावर लवकर येऊनही त्यांना बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. बसमध्ये प्रवासीही जास्त असल्याने विद्यार्थ्यांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. चिक्कोडी शहरात बोरगाव, बेडकिहाळ, सदलगा, मलिकवाड, एकसंबा, कल्लोळ, येडूर, नणदी, नणदीवाडी, हिरेकुडी भागातील पाच हजारापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे पुरेशा बस सोडण्याची मागणी होत आहे.

`कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. दोन महिन्यापासून शाळा पूर्वपदावर सुरू झाल्या असून बस नसल्याने शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचणी येत आहेत.`

-ऋतुजा मंगावे, विद्यार्थिनी, मलिकवाड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

KDCC Bank Decision : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना! पात्र शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार 'केडीसीसी' उचलणार; नफ्यातून भरणार 10 कोटींहून अधिक रक्कम

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

SCROLL FOR NEXT