MP Priyanka Jarkiholi esakal
पश्चिम महाराष्ट्र

'डॉ. आंबेडकरांनी ज्या न्यायालयात युक्तिवाद केला, तिथून मी..'; संसदेत काँग्रेस खासदाराच्या पहिल्याच भाषणाने वेधलं लक्ष

Priyanka Jarkiholi : आपल्या देशातील शिक्षणाचा स्तर घसरत चालला आहे. या देशासमोरील अनेक आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे.

सकाळ डिजिटल टीम

'माझ्या जिल्ह्यातील गोकाक आणि अथणीला नवीन केंद्रीय शाळा मंजूर करण्याची विनंती आम्ही केंद्राकडे केली आहे. मात्र, केंद्राकडून कोणतेही उत्तर आले नाही.'

चिक्कोडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी चिक्कोडी न्यायालयात युक्तिवाद केला होता. तिथून या सभागृहात प्रवेश केल्याचा मला अभिमान आहे, असे खासदार प्रियंका जारकीहोळी (MP Priyanka Jarkiholi) यांनी गुरुवारी संसद अधिवेशनात सभागृहातील पहिल्या भाषणात सांगितले.

यावेळी खासदार जारकीहोळी यांनी तरुणांच्या प्रगतीसाठी संसदेत (Parliament) आवाज उठवला. परीक्षांमधील गोंधळाने तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होईल, असे सांगून सर्वांचे लक्ष वेधले. खासदार जारकीहोळी संसदेत म्हणाल्या, एखाद्या देशाची प्रगती त्या देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवरून मोजली पाहिजे. त्यासंदर्भात मी काही मुद्दे सभागृहासमोर ठेवत आहे. आपल्या देशातील शिक्षणाचा स्तर घसरत चालला आहे. या देशासमोरील अनेक आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे. याची अनेक कारणे आहेत.

यापैकी काही केंद्र सरकारचे शिक्षणासाठीचे वार्षिक अंदाजत्रक वर्षानुवर्षे कमी पडत असल्याचेही आहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षीचे अनुदान आणि या वर्षीच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या तुलनेत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाला दिलेले अनुदान ५३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सरकारी संस्थांवर अवलंबून असलेल्या गरिबांचे जीवन दयनीय होत आहे. यावर उपाय काय? असा प्रश्न मला तुमच्यामार्फत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना विचारायचा आहे. माझ्या जिल्ह्यातील गोकाक आणि अथणीला नवीन केंद्रीय शाळा मंजूर करण्याची विनंती आम्ही केंद्राकडे केली आहे. मात्र, केंद्राकडून कोणतेही उत्तर आले नाही. ते लवकर सुरू करावेत, अशी विनंती मी तुमच्यामार्फत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना करू इच्छितो.

पूरग्रस्त शाळांना मदत द्या

माझ्या मतदारसंघात सध्या पूर आला आहे. अनेक शाळांच्या इमारती कोसळल्या आहेत किंवा मोडकळीस आल्या आहेत. याची पुनर्बांधणी करण्यासाठी केंद्राकडून प्रत्येक शाळेला दोन लाखांची मदत होणार आहे. मात्र, हा निधी माझ्या मतदारसंघात आलेला नाही. तो लवकरात लवकर देण्यात यावा. यामध्ये आणखी रक्कम वाढवून द्यावी, अशी विनंती खासदार जारकीहोळी यांनी सभापतींकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT