tarale.
tarale. 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण भागातील मुलांनी ठरविले तर स्पर्धा परिक्षेत नक्की यशः अमृता साबळे 

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे - स्पर्धा परिक्षा ही काही शहरी मुलांची मक्तेदारी नाही, ग्रामीण भागातील मुलांनी मनापासुन ठरविले तर स्पर्धा परिक्षेत नक्की यश मिळते. अनेक मुलांनी सिध्द करुन दाखविले आहे. त्यामुळे तारळे सारख्या निमशहराकडे वाटचाल करत असलेल्या गावातुनही प्रशासकिय सेवेत निवड झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. असे मत नुकतीच उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या व राज्यात अव्वल आलेल्या अमृता साबळे यांनी व्यक्त केले.

फिनीक्स स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेच्या वतीने आयोजित स्पर्धा परिक्षेत यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार व येथील युवकांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन मेळाव्याच्या संयुक्त कार्यक्रमात बोलत होत्या. 

अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे, निवृत्त गटविकास अधिकारी विलासराव साबळे, डॉ. मंगलताई साबळे, दिनेशसिंह पाटणकर, रामभाऊ लाहोटी, मधुकर पाटील, प. मा. जाधव, ज्योती शिंदे, प्रज्ञा कणसे, प्राजक्ता काळकुटे, अभिजीत काटे, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे अमृता साबळे म्हणाल्या, स्पर्धा परिक्षा कठिण समजली जाते मात्र जिद्द, स्वयंप्रेरणा, शिस्तबध्द अभ्यासाची पध्दत, वेळेचे नियोजन, स्वतःच्या क्षमतांचे आकलन, योग्य स्ट्रॅटेजी व मार्गदर्शन घेउन अभ्यास केल्यास तुम्हाला गावाकडे राहुनही यश मिळु शकते. त्यासाठी पुण्या मुंबईला जाउन महागडे क्लासेस लावण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीची यशोगाथा वेगवेगळी असते. कुणाला यश लवकर मिळते तर कुणाला उशिरा मात्र निराश न होता स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्नवादी रहा. यश मिळविण्यासाठी मनोरंजनापासुन दुर रहा, नैराश्य व नकारत्मकता झटकुन टाका, आपल्या क्षमतांना न्याय दया, यासह मुलाखतीचे किस्से सांगत स्पर्धा परिक्षेच्या स्वतःच्या प्रवासाची माहिती दिली. यानंतर उपस्थित मुलांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन व सरस्वती पुजन झाले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी पदी अमृता साबळे, तारळेतील प्रज्ञा कणसे यांची अन्न व ग्राहक मंत्रालयात लिपिक पदी, प्राजक्ता काळकुटे महसुल विभाग मंत्रालयात लिपिक पदी, ज्योती शिंदे उपनिरिक्षक राज्य उत्पादन शुल्क पदी, अभिजीत काटे यांची उपप्रादेशिक परिवहन विभाग लिपिक पदी, निवडी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगत प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच विलासराव साबळे, ज्योती शिंदे, प्रज्ञा कणसे, प्राजक्ता काळकुटे आदींनी मनोगते व्यक्त केली. सचिन वागडोळे यांनी स्वागत व सुत्रसंचालन, अमित पवेकर यांनी प्रास्तविक, सागर नडे यांनी आभार मानले. 
यावेळी तारळे विभागातील युवक, युवती व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिनीक्स स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेच्या सर्वांनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT