The chimneys of 12 factories in the district caught fire; Labor shortage 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात 12 कारखान्यांची धुराडी पेटली; पण मजुरांची टंचाई 

घनशाम नवाथे

सांगली : जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी अशा 12 कारखान्यांची धुराडी पेटलेली आहे. दिवाळीनंतर अधिकाधिक गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु बऱ्याच कारखान्यांना मजुरांची टंचाई भेडसावत आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीत साडे चौदा लाख टन उसाचे गाळप करून 14 लाख 70 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी उतारा 10.17 इतका आहे. 

जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी अशा 15 साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. परंतु प्रत्यक्षात 12 साखर कारखानेच सुरू झाले आहेत. परवाना मिळालेले तासगाव, डफळे कारखाना जत आणि यशवंत कारखाना नागेवाडी या तीन कारखान्यांत अद्याप गाळप सुरू नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर महांकाली, माणगंगा आणि केन ऍग्रो हे कारखाने यंदा बंदच आहेत. त्यामुळे बारा कारखानेच हंगाम सुरू ठेवतील असे चित्र दिसून येते. 

गतवर्षीच्या हंगामात शेवटी कोरोनाच्या संकटामुळे कारखान्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या. बरेच ऊसतोड मजूर जिल्ह्यात काही दिवस अडकून पडले. कारखान्यांना त्यांची राहणे व जेवणाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर त्यांना सुखरूप सोडावे लागले. या मजुरांनी कोरोनाच्या संकटाचा अनुभव घेतला. त्यानंतर कोरोनाची आपत्ती कायम असताना कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक कारखान्याकडे मजूर यंदा कमी प्रमाणात आले आहेत. त्यामुळे ऊसतोडीसाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. 

मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊसतोडणी करून घेण्यासाठी पाठपुरावा लागेल अशी परिस्थिती आहे. मजुरांची कमतरता असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी जादा पैसे द्यावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा सर्व परिस्थितीत कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. यंदा ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु मजुरांची कमतरता लक्षात घेऊन हंगामाच्या शेवटी अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागेल असे चित्र आहे. सध्या काही कारखाने दैनंदिन गाळप क्षमतेप्रमाणे कारखाने चालवत आहेत. परंतु काही कारखान्यांचे गाळप क्षमतेपेक्षा थोडे कमी असल्याचे दिसून येते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT