Citizens have started patrolling at night
Citizens have started patrolling at night 
पश्चिम महाराष्ट्र

चोरांची भीती, नागरिकांच्या हाती काठी!

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरासह उपनगरात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. पोलिस प्रशासनापुढे या चोरांनी आव्हान उभे केले आहे. चोऱ्या थांबत नसल्याने व पोलिस प्रशासनावर विसंबून न राहता, "आपुली सुरक्षा आपुल्या हाती' हे तत्व स्वीकारत अखेर नागरिकांनीच रात्रीची गस्त घालण्यास सुरवात केली आहे. विशेषत: उपनगरांवर चोरांचा "डोळा' असल्याचे दिसते. बंद घरे त्यांच्याकडून सातत्याने "टार्गेट' होत आहेत. त्यामुळे रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत उपनगरातील नागरिक जागता पहारा ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मध्य शहर व सावेडी, सारसनगर, पाइपलाइन रोड, तपोवन रोड, कल्याण रोड, बोल्हेगाव, नागापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या होत आहेत. त्यामुळे या परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली आहे. चोरांनी विशेषतः उपनगरे "टार्गेट' केल्याचे दिसत आहे. सावडीतील डॉन बॉस्को, कॉटेज कॉर्नर परिसरात मागील 15 दिवसांत दोन वेळा घरफोड्या झाल्या. शहरात दररोज किमान दोन ते चार घरफोड्या, दुकाने लुटली जात आहेत. मात्र, पोलिसांना या चोऱ्यांचा तपास लावण्यात यश आलेले नाही. दुसरीकडे चोरांचा धुमाकूळ सुरूच असून, त्यांच्यावर पोलिसांचा कोणताही वचक नसल्याचेच दिसते. त्यामुळे पोलिस प्रशासनही हतबल झाल्याचेच चित्र आहे. 


बाहेरगावी जाण्याचे "प्लॅन' रद्द

सध्या तरी चोरांच्या बंद घरावरच "नजरा' असल्याचे दिसते. त्यामुळे अनेकांनी घर बंद करून कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचे "प्लॅन' रद्द केले आहेत. रोज कुठे ना कुठे चोरी होत असल्याने, गस्त घालावी तरी कुठे, असा प्रश्‍न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. अखेर कुटुंबाच्या, घराच्या संरक्षणासाठी नागरिकांनीच हाती काठी घेतली आहे. दररोज रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिक जागता पहारा देत आहेत. नगर शहरातही अनेक भागात लोकच गस्त घालत असल्याचे दिसून येते. पोलिसांनीही गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT