पश्चिम महाराष्ट्र

स्वच्छता, कचरा समस्येबाबत वडूजला मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा

वडूज : शहरातील सार्वजनिक स्वच्छता व कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी आज नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहरातील कचरा व अन्य समस्यांबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया मांडल्या.
 
येथील नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळ, अभेद सामाजिक विकास संस्थतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चामध्ये नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, स्वीकृत नगरसेवक नीलेश गोडसे, संजय काळे, इम्रान बागवान, गणेश गोडसे, लखन पवार, विकल्प गोडसे, जयवंत गोडसे, कुणाल रायबोळे, ओंकार गोडसे, प्रतीक गोडसे, रवी गोडसे, विकास खुडे, संजय कदम, नवनाथ खुडे, आप्पाजी खुडे, संग्राम कांबळे आदी सहभागी झाले होते. 
आंदोलकांतर्फे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, गोडसे, शिंदे आदींनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन दिले.

निवेदनातील माहितीनुसार, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय शहरात चिकुनगुण्या, डेंगीसारख्या साथीच्या आजारांचा फैलाव होऊ लागला आहे, यावर कार्यवाही करण्यात नगरपंचायतीला अपयश आले आहे. शहरातील स्वच्छतेसाठी गेल्या दोन वर्षांपासून खासगी ठेकेदारास दरमहा चार ते पाच लाख रुपयांचा ठेका दिला आहे. मात्र, त्यांच्याकडून गेल्या दोन काही महिन्यांपासून स्वच्छतेचे समाधानकारक होत नाही. मुख्य रस्ते, गटारांची स्वच्छता वेळेवर केली जात नाही. ओला व सुक्‍या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. घंटागाड्यांचे नियोजन नाही, कामगार संख्या अपुरी आहे. शिवाय रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी वेळेवर होत नाही. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते होऊनही त्याचे दरमहा बिल अदा केले जात आहे. नगरपंचायत प्रशासन व ठेकेदारांमध्ये लागेबांधे असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. 

याशिवाय शहराजवळ असणाऱ्या कचरा डेपोजवळ हिंदू- मुस्लिम व लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी आहेत. जवळच नागरी वस्ती आहे. त्यामुळे कचरा डेपोतील कचऱ्याचा त्रास नागरिकांना होत आहे. शिवाय स्मशानभूमीचे पावित्र्यही धोक्‍यात येत आहे. शहरातील स्वच्छतेबाबत नगरपंचायत प्रशासनाला कळवूनही गांभीर्याने घेतले जात नाही. 

यावेळी विजय शिंदे, नीलेश गोडसे, दाऊदखान मुल्ला, धनाजी गोडसे, सलीम मुल्ला, मिलिंद लंगडे, किरण लोहार, चैतन्य गोडसे, अमोल जगताप आदींनी शहरातील स्वच्छतेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT