The city administration continues to fight for Korona 
पश्चिम महाराष्ट्र

काेराेनावर मात करण्यासाठी नगर प्रशासनाचा लढा सुरू

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना प्रसारावर मात करण्यासाठी नगर तालुका प्रशासनाचा सक्षमपणे लढा सुरू आहे. त्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग, गर्दीच्या नियंत्रणासाठी तब्बल अकरा पथके नेमली आहेत. त्याचप्रमाणे 24 तास कंट्रोल रूम कार्यरत असून, 272 गरजूंची जेवण, निवाऱ्याची व्यवस्था पाच ठिकाणी केली आहे. 

नगर तालुका प्रशासनाने नेमलेल्या पथकांकडून गर्दीचे नियंत्रण, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, पर्यवेक्षण करणे, लाउड स्पीकरद्वारे जनजागृती, तसेच वाहनांच्या तपासणीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील विविध कार्यालयांत 272 बेरोजगार व स्थलांतरित व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून रोज पाच ते सहा हजार गरजूंना जेवण दिले जाऊन, 300 ते 400 जणांना किराणा व धान्याचे वाटप करण्यात येते. आजअखेर एक लाख 57 हजार गरजूंना अन्नपाकिटांचे वाटप केले आहे.

प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींवर वॉच ठेवणे, तसेच संशयित व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. क्वारंटाईनसाठी तीन सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यांमध्ये साधारणतः 500 ते 700 लोकांची व्यवस्था केली आहे. 

"भातोडी'त थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी 
भातोडी पारगाव येथील चेकपोस्टमध्ये बीडच्या हद्दीवरील प्रत्येक वाहनाची तपासणी करून त्यातील व्यक्तींची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी केली जात आहे. नगर तहसील कार्यालयामध्ये 24 तास कंट्रोल रूम कार्यरत आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी 0241-2411600 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT