पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर येथे अपघातात उदमांजराचा बळी 

सकाळवृत्तसेवा

सांगली - इस्लामपूर येथे सांगली रस्त्यावर रेणुका मंदिराजवळ काल रस्ते अपघातात पट्टेरी शेपटीचे उदमांजर मृत्यूमुखी पडले.

निशाचर अशा या प्राण्याचा प्रामुख्याने जंगल व लगतचा गवताळ भाग अधिवास असतो. आपल्याकडे बोलीभाषेत त्याला इजाट असेही म्हणतात. शहरातील पडीक अशा इमारतींमध्येही त्यांचा वावर असतो. अशा निशाचर प्राण्यांचा विचार करून वाहने चालवावीत असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे. 

याबाबत श्री शेलार म्हणाले,"" रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला हा प्राणी थोडा वेगळा वाटल्याने मी आकाश पाटील यांना फोटो पाठवून माहिती घेतली. घरातील मांजरासारखा पण आकाराने दुप्पट असतो. याची डोक्‍यापासून ते शेपटीपर्यंतची लांबी सरासरी अडीच ते तीन फूट असते. तसेच उंची सरासरी एक फूट असते. शरीराचा मूळ रंग पिवळसर व त्यावर काळे ठिपके व पाय काळे असतात. याला ओळखण्याची महत्वाची खून म्हणजे याची शेपटी. कटांदर (कोकणातील नाव), पट्टेरी उदमांजर अशीही त्यांची ओळख आहे. उदमांजराच्या आपल्याकडे एकूण तीन चार प्रजाती आढळतात, त्यातील काळे उदमांजर सर्वत्र दिसते. आपल्या गावांमध्ये उंबर, पिंपळांवर ते रात्री दिसते. अन्नाच्या शोधात रात्री ते प्रामुख्याने उंदीर, लहान पक्षी, साप, सरडे आणि पाली पकडत असते. संधी मिळाल्यास ससाही पकडते. रात्रभर फिरून पहाटेच्या वेळी आपल्या घराकडे निघत असताना असे अपघात या प्राण्यांचा जीव घेत आहेत. सुंदर अशा प्राण्याचे अस्तित्व आता पुसले जात आहे. आपण काळजी घेतली तर ते जगू शकतील. नागरिकांनी वाहने सावकाश चालवावीत. अशा अनेक मुक्‍या प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे याचा विसर पडू नये.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT