Claim in court for leave pay of municipal employees 
पश्चिम महाराष्ट्र

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या वेतनासाठी न्यायालयात दावा

अजित कुलकर्णी

सांगली : राष्ट्रीय व धार्मिक सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या महानगरपालिका कामगार, कर्मचाऱ्यांना करारानुसार सुट्ट्यांचे वेतन मिळावे यासाठी संघटनेने महापालिकेकडे मागणी केली आहे. तरीही महापालिका सुट्ट्यांचे वेतन कराराप्रमाणे देत नसल्याने संघटनेने औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. 

कामगार अधिकाऱ्यांनी न्यायालयात कामगारांना सुट्यांचा पगार देण्याचे लेखी पत्र देऊनही तो दिला नसल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा कामगार सभेने दिला आहे. 
महापालिका कामगार सभेचे सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे यांनी सांगितले की, सन 2012, 2013, 2015, 2016 या सालाचे देणेत यावेत म्हणून औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने पात्र कामगार, कर्मचाऱ्यांना चारी वर्षांच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम कामगारांच्या बॅंक खातेवर वर्ग करण्याचे आदेश दिले होते. 

परंतु महापालिकेने आदेशाची अंमलबजावणी केली नाही म्हणून संघटनेने कामगार न्यायालयात तत्कालीन आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्या विरोधात फौजदारी दाखल केली. त्यानंतर महापालिकेने कामगार न्यायालयामध्ये प्रशासन अधिकारी (आस्था) अनिल चव्हाण यांचे सहीने पत्र देऊन सुट्ट्यांचा पगार कर्मचाऱ्यांना अदा करत असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर संघटनेने प्रशासन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संघटनेने त्यांना, सुट्ट्यांचा पगार केव्हा देणार हे निश्‍चित करण्यासाठी चर्चेला वेळ व तारीख देणेत यावी असे लेखी पत्रही दिले आहे.

त्याचीही दखल घेतलेली नसल्यामुळे संघटनेने कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी गुन्ह्यात सहआरोपी करण्याबाबत आयुक्तांकडे परवानगी मागितलेली आहे. आयुक्‍तांनी 15 दिवसांत परवानगी दिली नाही तर परवानगी दिली, असे समजून अनिल चव्हाण यांना सह आरोपी (फौजदारी) करण्यात येणार आहे, असे श्री. तांबडे, शिंदे यांनी सांगितले.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस 'ड्राय डे'; कोणत्या भागात मद्यविक्री कधी बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्चे तेल 100 डॉलरवर! मुंबई-नागपूर-पुणेसह महाराष्ट्रात आता पेट्रोल-डिझेल कितीला?

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : सतीश जारकीहोळी यांच्या घरावर ईडीची छापेमारी

SCROLL FOR NEXT