clean up employee dead in garbage depot in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

डोक्‍यात हायड्रोलिक जोरदार आपटल्याने सफाई कर्मचारी जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कचरावाहू वाहनाचे हायड्रोलिक डोक्‍यात आदळल्याने महापालिकेचा कंत्राटी सफाई कामगार ठार झाला. कल्लाप्पा बसवंत कांबळे (वय ५०, रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द) असे या मृत कामगाराचे नाव आहे. तुरमुरी कचरा डेपोत काल सायंकाळी ही घटना घडली. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की शहरातील कचऱ्याची उचल करून सफाई कामगार तो कचरा तुरमुरी डेपोत नेऊन टाकतात. त्यासाठी कचरावाहू वाहने रोज तुरमुरी कचरा डेपोकडे ये-जा करतात. सदर वाहनावर चालक म्हणून एक सफाई कामगारच असतो.  सायंकाळच्या सुमारास कचरावाहू वाहनातून कल्लाप्पा हे डेपोवर गेले होते. चालकाने हायड्रोलिक सुरू करून कचरा खाली केला. मात्र, वाहनाच्या मागे कल्लाप्पा थांबले असल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. पुन्हा हायड्रोलिक बंद केल्यावर मागे थांबलेल्या कल्लाप्पा यांच्या डोक्‍यात हायड्रोलिक अचानक जोरदार आपटल्याने ते जागीच ठार झाले.

सदर घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिस आणि महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आला. जूनमध्येही गांधीनगर येथील होलसेल फळ बाजाराजवळ सकाळच्यावेळी कचरावाहू वाहनात कचरा भरून घेत असताना चालकाने अचानक वाहन पुढे घेतल्याने खाली पडून एक सफाई कामगार ठार झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT