Cleaning in Chowka Chowka from Shramdana in Vita city 
पश्चिम महाराष्ट्र

विटा शहरात श्रमदानातून चौका चौकात स्वच्छता 

गजानन बाबर

विटा : येथील नागरिकांनी "वसा स्वच्छतेचा - निर्धार जनतेचा' या जोमाने स्वच्छता श्रमदानाला प्रतिसाद दिला. व्यावसायिक, व्यापारी, सराफ, नागरिकांनी विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते सराफ पेठ परिसरात स्वच्छता श्रमदान मोहीम राबवून परिसर स्वच्छ व सुंदर केला. 

"विटेकर नागरिकांनी शहरात स्वच्छता श्रमदान घेऊन शहर स्वच्छतेचा वसा सातत्याने जोपासला आहे. स्वच्छतेतील सातत्य कौतुकास्पद आहे." असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले. विटा नगरपरिषद वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक परिसर ते सराफ पेठ परिसरात स्वच्छता श्रमदान अभियान राबवले.

शहरातील संस्था, मंडळे, महिला व नागरिक यांच्या सहभागातून या स्वच्छता श्रमदान अभियानात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली जात आहेत. तसेच रस्ते, गटारी सफाई करुन श्रमदान मोहीम यशस्वीपणे पार पाडली जात आहे. यामध्ये यापुढे ही असेच सक्रिय योगदान नागरिकांनी यावे."असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले. 

क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते सराफ पेठ परिसरात घेतलेले स्वच्छता श्रमदान नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, यांच्या मार्गदर्शनखाली अभियान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह×डक्‍लोज, मास्क व सोशल डिस्टंसिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घेतलेल्या स्वच्छता श्रमदानात फिरोज तांबोळी,अविनाश चोथे,माधव रोकडे, कुलदीप रोकडे, सौरभ रोकडे, शुभम रोकडे, हर्ष रोकडे, दत्तात्रय दिवटे, अभिजीत सावंत आदींनी सहभाग घेतला. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Ambegaon gas distribution: ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम: आंबेगाव तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर अवसरी खुर्दमध्ये सव्वा महिन्यानंतर गॅस टाक्यांचे वितरण सुरू

SCROLL FOR NEXT