Cloudy Weather Affects Grape Crops Sangli Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

द्राक्ष पट्ट्यातील बागांना लागले 'ग्रहण'

सकाळ वृत्तसेवा

सांगली - अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सांगली जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. सायंकाळी हलका पाऊस झाला. द्राक्ष पट्‌ट्‌टातील तासगाव, मिरज परिसरात पावसाने शेतकऱ्यांत पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भुरी, मण्यांना तडा जाण्यासह गळ-फळ कुजीची शक्‍यता आहे. पाणी उतरलेल्या घडात कुजव्याची शक्‍यता आहे. पावसाचा द्राक्षाला फटका तर रब्बीतील पिकांसाठी पाऊस उपयुक्त आहे. 31 डिसेंबरपर्यंत ढगाळी वातावरण अंदाज आहे. जत, सांगलीतील काही भागात हलका पाऊस पडला. कवलापूर परिसरात वीस मिनीटे पावसाने हजेरी लावली. दुधोंडी, भिलवडी परिसरात अर्धातास पाऊस पडला. 

तासगावसह परिसरात सायंकाळी सहानंतर अवघा सात ते आठ मिनिटे हलका पाऊस झाला. मात्र आद्रता कमी होती. रात्रीत आणखी पाऊस झाला तर मात्र घडात पाणीसाठून भूरीची शक्‍यता आहे. साठ दिवसापुढील सर्व बागांसाठी हा धोका आहे. फुलोऱ्यातील बागांना फळ व कुजीची शक्‍यता आहे. मात्र या टप्प्यतील बागांची संख्या फार कमी असणार आहे. कोवळ्या पाने असलेल्या ठिकाणी डाऊनीची शक्‍यता असते. मात्र सध्याच्या स्थितीत डाऊनीचा धोका फार कमी आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात दुष्काळ, त्यानंतर महापूर, अवकाळीतून वाचवलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्या मागील संकटाची मालिका कायम असल्याचेच स्पष्ट होते आहे. अवकाळीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नवे संकट शेतकऱ्यासमोर उभे ठाकले आहे. रब्बी हंगामातील शाळू ज्वारी, हरभरा, मक्का, भूईमुग शेग आदी पिकांसाठी हा पाऊस मात्र उपयुक्त आहे. या पिकांच्या उत्पादनात वाढच अपेक्षीत आहे. 

दुधोंडी परिसरात अर्धातास पाऊस 

दुधोंडी - परिसरात आज अर्धातास पावसाने द्राक्ष बागायतदारांना पुन्हा फटका बसतो आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अर्धा तास पाऊस झाला. पावसाने द्राक्ष बागायतदारासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दोन-तीन दिवसापासून दुधोंडी परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. द्राक्ष बागायतदारांची पावसाने झोपच उडवली तर सध्या ऊसतोडीचा धडाका उठला आहे. झालेल्या पावसाने ऊस तोडीत व्यत्यय आला ऊस तोडी मजूरांनी ऊस तोडी सोडून खोपटी व्यवस्थित करण्यासाठी एकच धावपळ केली. द्राक्ष बागायतदारामधूनही पावसाच्या उघडी पी नंतर द्राक्ष बागा वर औषध फवारणी साधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत धावपळ केली. 

भिलवडी परिसरात ऊसतोडणी फडात पाणी 

भिलवडी - भिलवडीसह माळवाडी, चोपडेवाडी, खंडोबाचीवाडी परिसरात सायंकाळी अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. सकाळपासून आभाळ होते. सूर्यग्रहण ढगांमुळे अस्पष्ट दिसले. दुपारपासून आभाळ भरून आले. सायंकाळी पाऊस झाला. अचानक सुरु झालेल्या पावसाने ग्रामस्थांची धावपळ उडाली. या पावसाने ऊस तोडणी सुरू असलेल्या फडामध्ये पाणी साठले आहे. ऊस भरलेल्या ट्रॉल्या अडकुन पडल्या आहेत. मजुरांच्या झोपडयांमध्ये पाणी साठल्याने त्यांची त्रेधातिपट उडाली. महापूर व नंतरच्या पावसानंतर जमीनाला घात येताच शाळु व हरभऱ्याची टोकणी झाली. उगवणही चांगली झाली आहे. पाण्याची एक पाळी, औषध फवारणी झाली आहे मात्र पावसाने या पिकांना फटका बसणार आहे. गेली महिनाभर ढगाळ वातावरणामुळे हवेत उकाडा आहे. थंडी कमी असल्याने पिकांची वाढ संथ असुन कीड वाढली आहे. 

पाऊस जादा झाल्यास द्राक्ष मण्यांना तडा

हलका पाऊस आहे. आद्रता जास्त आणि पाऊस जादा झाल्यास द्राक्ष मण्यांना तडा अन्‌ भूरीची शक्‍यता आहे. डाऊनीची शक्‍यता फार कमी आहे. फुलोऱ्यातील बागांची संख्या कमी असली तरी फळांची गळ होवू शकते. कॅल्शियम, बोरॉन, पालाशच्या फवारण्या तात्काळ घेता येतील.
 - एन. बी. म्हैत्रे, द्राक्षतंज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT