पश्चिम महाराष्ट्र

'राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांचे कोटींचे नुकसान'

अनिल पाटील

राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूलही होणार आहे.

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूलही होणार आहे. येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून हा प्रकल्प टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या गायरानात करावा, या मागणीचे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शेतकऱ्यांनी दिले.

यावेळी चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते. यावेळी चिक्कोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांनी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, युवराज माने, बाळासाहेब हादिकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील,  मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनिर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वडर, संतोष चौगुले, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सचिव कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे, यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMJJBY : सरकार देत आहे फक्त ४३६ रुपयात २ लाखांचा विमा, पण कोणाला मिळतो लाभ ? जाणून घ्या

Student Abuse Case : मुख्याध्यापकच निघाला वासनांध, आजारी आईची विचारपूस करण्यासाठी यायचा अन् विद्यार्थिनीवर वारंवार नको ते केलं...

Shrirampur Crime: नायगाव धुमश्चक्री प्रकरण, बेपत्ता तरुणाचा गोदापात्रात मृतदेह आढळला,नगरसेवकासह १५ जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं..

ZP Panchyat Samiti Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळी; राजकीय हालचालींना वेग : युती, आघाड्यांवर गणिते अवलंबून

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी 5 ते 6 यावेळेत पुरुषांना प्रवेश बंदी

SCROLL FOR NEXT