CM Eknath Shinde esakal
पश्चिम महाराष्ट्र

Tembu Yojana : 'टेंभू'च्या सहाव्या टप्प्याला अनिल बाबरांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची भरसभेत ग्वाही

CM Eknath Shinde : सुळेवाडी (विटा) येथे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

सकाळ डिजिटल टीम

‘‘टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होणार आहे.''

विटा : टेंभू योजनेच्या (Tembu Yojana) पूर्ततेसाठी आमदार दिवंगत अनिल बाबर (Anil Babar) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचे नाव देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी जाहीर केले.

सुळेवाडी (विटा) येथे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आमदार दिवंगत अनिल बाबर यांच्याशिवाय होत आहे. टेंभू योजनेसाठी त्यांची तळमळ मी पाहिली आहे. भूमिपूजनाला ते हयात असायला हवे होते. नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे. हा ध्यास त्यांचा होता. त्यांच्या मागे सुहास व अमोल बाबर विकासकामांचा पाठपुरावा करतात. त्यांच्या मागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे.’’

‘‘टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होणार आहे. सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे,’’ असे ते म्हणाले.

विटा बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचा प्रारंभही आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, तानाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT