पश्चिम महाराष्ट्र

वारंवार पूर येऊ देणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही

स्नेहल कदम

सांगली (मौजे डिग्रज) : कोल्हापूर विमावतळावर मुख्यमंत्री यांचं आगमन झालं आहे. त्यानंतर ते मोटारीने सांगलीकडे (Sangli flood) रवाना झाले. दरम्यान भिलवडी आणि अंकलखोप येथे बोलताना उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरानाचे संकट आहे. त्यामुळे शक्यतो गर्दी टाळा. मास्क वापला असे आवाहन त्यांनी केले आहे. पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे, घरे वाहून गेली आहेत. मात्र प्रशासन कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. (Sangli Latest News in Marathi)

कायमस्वरुपी तोडग्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल, नागरिकांची पुनर्वसनाची तयारी आहे का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडी नागरिकांना केला आहे. वारंवार पूर येऊ न देता कायमस्वरुपी यावर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुर दरवर्षी येतो. मुख्यमंत्री, मंत्री दरवर्षी अशी पाहणी करणार, चौकशी करुन जाणार, असेच आयुष्य जगायचे का ? असा सवाल त्यांनी यावेळी अकंलखोपवासियांना केला आहे.

दरम्यान त्यांनी कसबे डिग्रज येथे पहाणी केली आहे. पुराच्या पाण्यात ही दोन्हा गावे पाण्याखाली होती. दरम्यान स्थानिकांनी त्यांना निवेदने दिली आहे. पुढे मुख्यमंत्री आयर्विन पुलावर पोचले असून त्यांना पूरस्थितीची माहिती व्हावी यासाठी विविध नकाशे तयार करण्यात आले आहेत. या पाहणीदरम्यान अधिकार्‍यांनी पुरावेळी नागरिकांना कसे स्थलांतरित केले, कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते. पुढे मुख्यमंत्री हरभट रोडला रवाना झाले आहेत. तिथेही ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ; इंडिया आघाडीचे नेते राहणार उपस्थित

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT